JOIN US
मराठी बातम्या / Viral / शाब्बास गड्या! गोमातेला वाचवण्यासाठी बळीराजा जंगलाच्या राजाशी भिडला; थरारक VIDEO

शाब्बास गड्या! गोमातेला वाचवण्यासाठी बळीराजा जंगलाच्या राजाशी भिडला; थरारक VIDEO

गायीसाठी सिंहाशी भिडलेल्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

शेतकऱ्याने गायीला सिंहापासून वाचवलं. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 30 जून :  सिंह…जंगलाचा राजा… ज्याच्याशी भिडण्याची हिंमत भल्याभल्या प्राण्यां चीही होत नाही. अशा प्राण्याशी एखाद्या माणसाने टक्कर देणं, याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली. जंगलाशी राजाशी भिडणारी ही व्यक्ती म्हणजे बळीराजा. सिंहाने शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला आणि मग आपल्या गोमातेला वाचवण्यासाठी शेतकरी सिंहाशी वाघासारखा भिडला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सिंहाने एका गायीवर हल्ला केला. गायीला आपल्या जबड्यात घेतलं. तसं सामान्यपणे कोणताही प्राणी तो सिंहाच्या जबड्यात असेल तर साहजिकच त्याच्याजवळ जाण्याची हिंमत कुणाची होणार नाही. पण गायीला सिंहाच्या जबड्यात पाहून शेतकरी मात्र कळवळला. गायीला आई मानलं जातं. गोमाता म्हटलं जातं. अशा गोमातेचा डोळ्यादेखत जीव जाताना शेतकऱ्याला पाहावलं नाही. त्याने हिंमत करत सिंहाशी टक्कर दिली. स्वतःचा जीव धोक्यात टाकत शेतकऱ्याने गायीला सिंहापासून वाचवलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मधोमध सिंहाने गायीवर हल्ला केल्याचं दिसतं आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीतील प्रवाशांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. Wild Life : हरणाला खाण्यासाठी वाघ वाघिणींमध्ये जुंपली, शेवटी कोणी नेलं शिकार? पाहा Photo सिंहाने गायीला आपल्या जबड्यात धरलं आहे. मानेला पकडलं आहे. गाय सिंहाच्या जबड्यातून सुटण्यासाठी धडपड करते आहे. इतक्या समोरून एक व्यक्ती येते. हिंमत करत ती सिंह आणि गायीजवळ ती येते. गायीला वाचवण्यासाठी काय करावं ते त्यालाही सुचत नाही. शेवटी तिथंच असलेला एक दगड ही व्यक्ती हातात घेते आणि सिंहावर मारायला जाते. इतक्यात सिंहाचं व्यक्तीकडे लक्ष जातं आणि गायीला सोडून सिंह आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकून पळतो. VIDEO - ‘वाघिणी’समोर जंगलाच्या राजाचं काहीच चाललं नाही; रस्त्यावर येताच महिलेने सिंहाला उचलून नेलं ही घटना गुजरातच्या गीर सोमनाथमधील आहे. जुनागढमधील केशोदचे नगरसेवक विवेक कोटाडिया यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. शेतकऱ्याचं गायीवरील प्रेमाचं कौतुक करत त्याच्या हिंमतीला दाद दिली जाते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या