नवी दिल्ली, 23 जून : तुम्ही माणसांना पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला बाहेर फिरताना किंवा त्यांच्यासोबत खेळताना पाहिले असेल. पण त्या कुत्रा-मांजराच्या जागी सिंह असेल तर… फक्त कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटला ना? पण असा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका महिलेने चक्क सिंहाला कुत्रा-मांजर किंवा आपल्या मुलाला कुशीत घ्यावं तसं घेतलं आहे. व्हिडीओ पाहूनच धडकी भरेल. सिंहाला बिनधास्त उचलून नेणारी ही महिला. सिंहासोबत असं कुणी केलं तर साहजिकच चर्चा होणार. सिंहाला हातात घेऊन जाणारी ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नसती तर कुणाला सांगून यावर विश्वासही बसला नसता. व्हिडिओमध्ये काळ्या कपड्यातील एक महिला दिसते आहे. जिच्या हातात सिंह आहे. आता सिंहाचं छोटंसं पिल्लू असतं तर ठिक होतं पण हा तर भलामोठा सिंह आहे. महिलेने त्याला जबरदस्ती उचलून घेतलं आहे आणि हातात घेऊन जाते आहे. महिलेने उचलल्याने सिंहाला राग आला आहे, तो चवतळला आहे. रागाने गुरगुरताना आणि महिलेच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना तो दिसतो आहे. इवल्याशा उंदराची कुत्रा-मांजराशी जबरदस्त फाइट; ‘टॉम अँड जेरी’पेक्षाही भारी VIDEO VIRAL जसं लहान मुलांना जबरदस्ती उचलून घ्यावं आणि ते रडत आपले हातपाय हलवतात हा सिंहही अगदी तसंच करतो आहे. महिलाही त्याच्यावर आईने मुलावर राग काढावा तसं काढते आणि त्याला रागात खाली सोडते. माहितीनुसार ही घटना कुवेतमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. हा या महिलेचा पाळीव सिंह आहे. तो घराबाहेर पडून रस्त्यावर फिरत होता. तेव्हा महिला त्याला पकडून पुन्हा आपल्या घरी घेऊन जात होती. Viral Video: बापरे! व्यक्तीची वाघासोबत मस्ती, अंगावर झोपून केलं KISS, पाहून व्हाल शॉक सीसीटीव्ही इडियट या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धडकी भरली आहे. त्यावर तशाच कमेंट येत आहेत. काही जणांनी तर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
Meanwhile............... https://t.co/n0S9z0Zb0p
— CCTV IDIOTS (@cctvidiots) June 22, 2023
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.