JOIN US
मराठी बातम्या / Viral / पावसात घराबाहेर पडत असाल तर हा VIDEO बघाच, मृत्यूच्या दारातून परत आला व्यक्ती

पावसात घराबाहेर पडत असाल तर हा VIDEO बघाच, मृत्यूच्या दारातून परत आला व्यक्ती

यात वीज पडतानाचं भयानक दृश्य पाहायला मिळतं. या वीजेचं रूप इतकं भयानक होतं, की एका व्यक्तीचा जीव अगदी थोडक्यात वाचला

जाहिरात

पाऊस सुरू असतानाच वीज पडली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद 28 जुलै : सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आहे. काही ठिकणी झाडं कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रहिवासी भागातही पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसाच वीज कोसळण्याच्या घटनाही घडत आहे. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात वीज पडतानाचं भयानक दृश्य पाहायला मिळतं. या वीजेचं रूप इतकं भयानक होतं, की एका व्यक्तीचा जीव अगदी थोडक्यात वाचला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बाहेर पाऊस सुरू आहे. अशात एक तरुण काहीतरी कामासाठी आपल्या घरातून बाहेर पडतो. आपलं काम करून तो परत घरात जातो. इतक्यात अचानक घरासमोरच वीज कोसळते. या वीजेचं भयानक रूप व्हिडिओमध्ये दिसतं. जर हा तरुण थोडं उशिरा तिथे आला असता तर यात त्याचा जीवही जाऊ शकत होता

संबंधित बातम्या

सुदैवाने वीज अशा वेळी पडली जेव्हा त्या मुलाशिवाय कोणीही तिथं उपस्थित नव्हतं. सुदैवाने घटनेत कोणालाही जीव गमवावा लागला नाही. विजेचं हे भीषण दृश्य जवळच बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. याआधीही लँगर हौज येथील कुतुबशाही काळातील मशिदीवर वीज पडल्याची घटना घडली होती. VIDEO: महिलेची पर्स चोरून पळण्याच्या प्रयत्नात होता चोर; इतक्यात बसचे दरवाजे बंद झाले अन् भलतीच फजिती हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हैदराबादमध्ये पावसाचा जोर या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर मुसळधार पावसात घराबाहेर पडण्याची चूक कोणीही करणार नाही. त्यामुळे अशावेळी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या