बिबट्याने हवेत केली शिकार (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 16 जुलै : आजवर शिकारीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण कोणत्या प्राण्या ला हवेत उडत शिकार करताना पाहिलं आहे का? प्राणी आणि हवेत कसा काय उडेल, असं तुम्ही म्हणाल. पण असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका बिबट्या ने चक्क हवेत उडत शिकार केली आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. जंगलाचा राजा सिंह आहे पण शिकार करण्यात मात्र बिबट्या सिंहापेक्षाही तरबेज आहे. सिंह उघडपणे येतो आणि शिकार करून निघून जातो. मात्र बिबट्या शोधात राहतो आणि मागून हल्ला करतो. तो अनेकदा रात्री शिकारीला जातो. पण दिवसभरातही त्याला अन्न दिसलं तर तो सोडत नाही. तो जमिनीवरचा सर्वात हुशार हल्लेखोर आहेच, पण झाडावर चढून हवेत झेपावतही तो आपली शिकार पकडतो. VIDEO - जंगलातील झाडात लपून फोटोग्राफर बनवत होता व्हिडीओ; इतक्यात बिबट्याची नजर पडली अन्… आता बिबट्याने हवेत शिकार करणं कसं शक्य आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहण्याची उत्सुकता असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता झाडावरून एक माकड पळताना दिसतं. त्याच्यामागे एक बिबट्या दिसतं. माकडं तशी या झाडावरून त्या झाडावर उडी मारण्यात हुश्शारच असतात. इथंही माकडाने बिबट्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारली. बिबट्यानेही त्याच्यामागोमाग झाडावरून उडी मारली पण तो खाली पडला. पण त्याने माकडाचा पाठलाग सोडला नाही. तिथून तो दुसऱ्या झाडावर गेला. तेव्हा दुसऱ्या झाडावर गेलेलं माकड पुन्हा पहिल्या झाडावर आलं. तशी त्याच्यामागोमाग दुसऱ्या झाडावर चढलेला बिबट्या हवेत झेपावला. हवेत उडत तो पहिल्या झाडावर गेला आणि माकड पळण्याआधीच त्याने त्याला पकडलं. हवेतच बिबट्याने माकडाची शिकार केल्याचं दिसतं. Viral Video - मेंढीला वाचवायला गेला आणि दलदलीत अडकला त्याचाच पाय; शेवट असा की… भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळेच बिबट्याला सर्वात संधीसाधू आणि बहुमुखी शिकारी म्हणून ओळखलं जातं, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी बिबट्याची अधिकाधिक माहिती दिली आहे. बिबट्या हे झाडांवर चढण्याची क्षमता असलेल्या मोठ्या मांजरींमध्ये सर्वात कुशल शिकारी आहेत. ते जलद, कार्यक्षम आणि अत्यंत शक्तिशाली आहेत. ते कोणत्याही उंचीवर जाऊ शकतात. बिबट्यांमध्ये अविश्वसनीय ताकद असते आणि ते झाडावर 50 फूट चढू शकतात. ते नेहमी आल्या तोंडात ताजी शिकार पकडतात. अगदी स्वतःहून मोठी आणि जड शिकारही. काहीवेळा ते अन्न वर लपवून ठेवतात जेणेकरून सिंह किंवा हायनासारख्या इतर शिकारींना ते मिळणार नाही.