जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video - मेंढीला वाचवायला गेला आणि दलदलीत अडकला त्याचाच पाय; शेवट असा की...

Viral Video - मेंढीला वाचवायला गेला आणि दलदलीत अडकला त्याचाच पाय; शेवट असा की...

मेंढीला दलदलीतून वाचवणारा देवदूत.

मेंढीला दलदलीतून वाचवणारा देवदूत.

मेंढीला दलदलीतून वाचवण्यासाठी व्यक्तीने स्वतःचाही जीव धोक्यात घातला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जुलै :  स्वतः आणि फक्त आपल्या माणसांसाठी करणारे खूप लोक आहेत. पण इतरांसाठी करणारे कमीच. एखाद्याचा जीव संकटात असेल तर त्याच्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून वाचवणारे देवदूत क्वचितच आढळतात. त्यातही मुक्या जीवांसाठी काही करणारे दुर्मिळच. असाच मुक्या जीवाच्या जीवासाठी आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या एका देवदूताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक मेंढी दलदलीत अडकली.  आता दलदलीत पाय ठेवायची हिंमत कोण बरं करेल. पण एका व्यक्तीने ते केलं. मेंढीला वाचवण्यासाठी या व्यक्तीने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. ही व्यक्तीही दलदलीत उतरली. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. VIRAL VIDEO - एकटी समजून सिंहाचा म्हशीवर हल्ला; पण असं काही घडलं की जंगलाचा राजा धूम ठोकून पळाला व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दलदलीत बसलेली ही मेंढी. तिचं निम्मं शरीर दलदलीच्या आत गेलं आहे. ती स्वतः काहीही करू शकत नाही. त्यामुळे बिच्चारी गप्प तशीच तिथं बसून आहे. एका व्यक्तीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती व्यक्ती दलदलीत जाते. तुम्ही पाहाल तर पाय ठेवताच त्या व्यक्तीचा पाय त्या दलदलीत अडकतो आहे. कसाबसा स्वतःला सावरत तो आत जातो. बसून सरकत सरकत तो मेंढीपर्यंत पोहोचतो. मेंढीला दोन्ही हातांनी खेचून दलदलीत बाहेर काढतो. पण स्वतःला आणि त्या मेंढीला एकाच वेळी दलदलीत बाहेर काढणं त्यालाही कठीण जातं. त्यामुळे तो मेंढीला ठेवत, काढत असं दलदलीच्या किनाऱ्यापर्यंत आणतो. अखेर स्वतःसह तो मेंढीलाही दलदलीतून सुखरूप बाहेर काढतो. तेव्हा कुठे आपल्याही जिवात जीव येतो. एकमेकींच्या जीवावर उठल्या दोन मगरी; खतरनाक फायटिंगचा VIDEO VIRAL @theafghan इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या व्यक्तीचं कौतुक केलं जातं आहे. युझर्सच्या बऱ्याच कमेंट येत आहेत. मानवता प्रत्येक धर्माच्या वर आहे, प्राण्यांबद्दल सहानुभूती असणं महत्त्वाचं आहे. या व्यक्तीचा आत्मा सुंदर आहे, त्याला स्वर्ग मिळो. अशा प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात