JOIN US
मराठी बातम्या / Viral / इवलासा म्हणून शिकार केली, पण छोटाशा पक्षीही बिबट्यावर पडला भारी; कसं वाचवलं स्वतःला पाहा VIRAL VIDEO

इवलासा म्हणून शिकार केली, पण छोटाशा पक्षीही बिबट्यावर पडला भारी; कसं वाचवलं स्वतःला पाहा VIRAL VIDEO

बिबट्या आणि पक्ष्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

बिबट्याच्या तावडीतून सुटला पक्षी (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जून : बिबट्याच्या शिकारीचे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील.  बिबट्या समोर एखादा शिकार आला की तो त्याच्या तावडीतून सुटणं अशक्यच. भल्याभल्या प्राण्यां चा बिबट्यासमोर टिकाव लागत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक छोटासा पक्षी ज्याने बिबट्यापासून स्वतःचा जीव वाचवला आहे. त्याने शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बिबट्यासमोर छोटाशा पक्षी आलं तर त्याचं काय होईल? साहजिकच तुम्ही म्हणाल की तो पक्षी जिवंत राहणार नाही. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला धक्काच बसेल. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. अवघ्या दोन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. शेवटच्या क्षणी पक्ष्याने बिबट्याचा शिकारीचा डाव मोडून काढला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक बिबट्या दिसतो आहे. त्याच्यासमोरून एक छोटासा पक्षी चालत येतो. आपल्यासमोर संकट आहे, याची जाणीव आधी या पक्ष्याला नाही. बिबट्या त्याच्या शिकारीसाठी दबा धरून बसला आहे. पक्षी हळूहळू चालत बिबट्यापासून दूर जातो. बिबट्या त्याच्या मागेमागे पळत जातो. तेव्हा पक्ष्याला आपल्यामागे असलेल्या संकटाबाबत समजतं आणि तो पळू लागतो. धक्कादायक! मुलाला जबड्यात धरून पाण्यात नेलं, पण मगरीचाच मृत्यू; Shocking Video Viral बिबट्यापेक्षाही पक्ष्याचा पळण्याचा वेग जास्त आहे. पण तरी या खतरनाक शिकाऱ्यासमोर आपण पळून किती पळणार याची कल्पना त्या पक्ष्यालाही कदाचित आली. त्यामुळे त्याने आपली शक्ती वापरण्यापेक्षा युक्ती वापरली. बिबट्या जवळ येताच पक्ष्याने मरण्याचं नाटक आलं. पक्षी मृत झाला समजून बिबट्याने त्याला आपल्या जबड्यात धरलं. पक्ष्याला तोंडात धरून तो इथं तिथं नाचवू लागलं. जमिनीवर ठेवल्यानंतर त्याच्यावर पंजे मारू लागला. त्यानंतर एका ठिकाणी तो निवांत बसला आणि आपल्यासमोर त्या पक्ष्याला ठेवलं. VIDEO - जेव्हा आमनेसामने आले 2 शिकारी! बिबट्या-ब्लॅक पँथरमध्ये लढाई, कोण कुणावर ठरलं भारी? बिबट्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे समजून पक्ष्याने संधी साधून तिथून पळ काढला. बिबट्याही पक्ष्याला जिवंत पाहून धक्का बसला. तो त्या पक्ष्याकडे एकटक पाहतच राहिला. काहीच करू शकला नाही.

@Latest Sightings या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या