पाटणा, 14 जून : मगरीच्या शिकारीचे आजवर तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कधी सिंह, कधी चित्ता, कधी बिबट्या अशा भल्याभल्या प्राण्यांचाही मगरी ने गेम केला आहे. मग या मगरीसमोर माणसांचं काय चालणार. अशाच एका मगरीने एका मुलाची शिकार केली आहे. पण शिकार केल्यानंतर मगरीचाच मृत्यू झाला आहे. अवघ्या 20 मिनिटांत मगरीने जीव सोडला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. दहा वर्षांचा हा मुलगा गंगा नदीत गेला. तिथं मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने त्याला आपल्या जबड्यात खेचून पाण्यात नेलं. मगरीच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी महाकाय शिकारीला पकडण्याचा डाव आखला. यासाठी ग्रामस्थांनी सापळा रचून मगरीला पाण्यातून बाहेर आणलं.
स्थानिक मच्छीमार जाळं घेऊन पाण्यात गेले. सुमारे 20 मिनिटांनी ती सापडली. तिने मुलाला पकडून ठेवलं होतं. बाहेर काढल्यावर संतापलेल्या लोकांनी मगरीला काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मगरीला इतकं मारलं की त्याचा मृत्यू झाला. VIRAL VIDEO - तलावातील मगरींच्या कळपात व्यक्तीने फेकलं मांस, एक मगर मात्र पाण्याबाहेरच आली अन्… या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये मगर जाळ्यात अडकलेली दिसत असून संतप्त गावकरी त्याला बेदम मारहाण करत दिसत आहेत. Video Viral : मगरीच्या जबड्यात पाय ठेवून करत होता स्टंट; व्यक्तीसोबत भयानक घडलं घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार बिदुपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सिराज हुसैन यांनी सांगितलं की, शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मगरीचा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.
While bathing in the Ganga in Vaishali, crocodile attacked, child died, villagers caught crocodile Gokulpur incident of Bidupur police station #Bihar pic.twitter.com/1iCiqlXxF1
— Siraj Noorani (@sirajnoorani) June 13, 2023
@sirajnoorani ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.