बिबट्या आणि ब्लॅक पँथरची लढाई
नवी दिल्ली 29 मे : काही वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी माणसं फार उत्सुक असतात. विशेषत: ते प्राणी जे सफारीच्या वेळीही लवकर दिसतात. यामुळेच जेव्हा अशा प्राण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर येतात तेव्हा ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. असाच काहीसा व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण कदाचित तुम्ही इंटरनेटवर या प्रकारचा व्हिडिओ कदाचितच याआधी पाहिला असेल. अनेकदा जेव्हा दोन शिकारी प्राणी जंगलात एकमेकांशी भिडतात तेव्हा मुद्दा नेहमीच शिकारीचाच असतो असं नाही. अनेक वेळा ही लढाई त्या भागात आपलं वर्चस्व टिकवण्यासाठीही असते. ज्यासाठी जंगलातील मोठे शिकारी एकमेकांशी भिडतात. आता अशीच एक क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये बिबट्या आणि ब्लॅक पँथर एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. एका IFS अधिकाऱ्याने हे दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाब्बास रे पठ्ठ्या! मुलाला तुडवत गेली घोडी, पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आधी एक बिबट्या दिसतो. जो झाडावर आरामात बसलेला असतो पण इतक्यात एक ब्लॅक पँथर तिथे येतो. ज्याला आपण सगळे ‘जंगल बुक’मुळे बघीरा या नावानेही ओळखतो. तो बिबट्याला पाहतो आणि हल्ला करण्यासाठी झटपट झाडावर चढतो. हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला असं वाटतं की आज त्यांच्यात कडाक्याचं भांडण होईल. मात्र, ब्लॅक पँथरला पाहताच बिबट्या अॅक्शन मोडमध्ये येतो आणि ब्लॅक पँथरवर हल्ला करण्याच्या तयारीत असतो. हे पाहून ब्लॅक पँथर लगेचच माघार घेतो आणि अगदी वेगात झाडावरुन खाली उतरून तिथून निघून जातो.
हा व्हिडिओ IFS @GuptaIfs यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की हे दोन प्रौढ शिकारी परिसरात लढत आहेत. खरं तर बिबट्याला जंगलातील निर्दयी शिकारी म्हटलं जातं, तर ब्लॅक पँथरला घोस्ट ऑफ द जंगल म्हटलं जातं. दोघेही इतके धोकादायक शिकारी आहेत की ते आपल्या शिकारीला पळून जाण्याची संधीही देत नाहीत.