व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 08 जुलै : सोशल मीडिया व्हिडीओचा खजाना आहे. इथे एकदा का तुम्ही आलात तर तुमचा वेळ कसा निघू जाईल याचं भान तुम्हालाच उरणार नाही. इथे मनोरंजक तर कधी जुगाडाचे व्हिडीओ शेअर केले जातात. जे खरोखरंच कौतुकास्पद असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही त्यांनी लावलेल्या युक्तीचं नक्कीच कौतुक देखील कराल. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाडसोबत असे काही केले आहे, जे सर्वांनाच आवडले आहे आणि खऱ्या आयुष्यात लोकांना त्याचा खूप उपयोगही होऊ शकतो. असं म्हटलं जात आहे. या मजूरांचा व्हिडीओ आहे. जे भिंत बांधत आहे. पण ती बांधण्यासाठी त्यांनी बेसिक गोष्टींचा वापर करून आश्चर्यकारक मशीन बनवली, ज्यामुळे त्यांचं काम सोपं आणि फास्ट झालं आहे. Video : मजुरांच्या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स ही फेल, एकदा हा जुगाड पाहाच हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या अकाउंटवरु शेअर केला आहे आणि त्यात कामगारांचा एक गट भिंत बांधताना दिसत आहे. क्लिप पुढे जात असताना, लाकडी फळीच्या एका टोकाला दोन कामगार बसलेले दिसतात.
आणखी दोन कामगार फळी उचलताना दिसतात जेणेकरून एक कामगार एक वीट उचलून भिंतीवर ठेवणाऱ्या दुसऱ्या कामगाराला देऊ शकेल.
या व्हिडीओला लाखोवेळा पाहिलं गेलं आहे आणि त्यावर भरपूर प्रतिक्रिया ही येत आहेत. या स्वदेशी तंत्रज्ञानाने लोक पूर्णपणे हैराण झाले आहेत. जुगाडमुळे खरोखरच कामाचा वेग वाढला, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.