JOIN US
मराठी बातम्या / Viral / टॉवेल न धुता तुम्ही किती वेळ वापरू शकता? टॉवेलचं हे सत्य धक्कादायक

टॉवेल न धुता तुम्ही किती वेळ वापरू शकता? टॉवेलचं हे सत्य धक्कादायक

टॉवेल हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्यांच्या स्वच्छतेकडे आपण फारसे लक्ष देत नाही.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : कोरोना महामारीपासून लोकांनी स्वच्छता आणि हेल्थकडे लक्ष देण्यावर भर ठेवली आहे. कारण एकामागून एक नवनवीन आजार येत आहेत. म्हणून लोक कुठेही बसताना तेथील जागा साफ करतात. शिवाय काहीही खाताना हात धुतात. अनेक लोक स्वच्छतेची काळजी घेतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का की तुम्ही अंग पुसणारा टॉवेल किती स्वच्छ असेल? काही लोक टॉवेलला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुतात. काही बॅचलर्स लोक हे घराबाहेर राहातात ते बऱ्याचदा दोन आठवडे टॉवेल न धुता वापरतात. पण या टॉवेलला किती दिवस न धूता तुम्ही वापरु शकता? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आंघोळ, चेहरा आणि हात धुतल्यानंतर आपण प्रथम टॉवेल वापरतो. जरी, बहुतेक लोक त्यांचे शरीर चांगले स्वच्छ करतात, परंतु त्यांच्या टॉवेलच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाहीत. टॉवेल हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? तुमच्या टॉवेलमध्ये किती बॅक्टेरिया असू शकतात याचा कधी विचार केला आहे? नसेल तर आत्ताच विचार करायला सुरुवात करा. कारण जर आपण घाणेरडा टॉवेल वापरत असू तर शरीर स्वच्छ ठेवूनही तुम्ही आजारी पडू शकता. आंघोळीनंतर, चेहरा आणि हात धुतल्यानंतर जेव्हा आपण आपले शरीर किंवा हात आणि तोंड टॉवेलने कोरडे करतो तेव्हा काही जीवाणू त्याच्या तंतूंना चिकटतात. यानंतर, तुमच्या टॉवेलमध्ये असलेला ओलावा या जंतूंना वाढण्यासाठी सर्वोत्तम वातावरण प्रदान करते. आता तुम्ही तुमचा टॉवेल न धुता आणि कोरडा न करता पुन्हा पुन्हा वापरलात, तर त्याच्या तंतूमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमच्या त्वचेतून आणि नाकातून तुमच्या शरीरात पोहोचू शकतात आणि तुम्हाला आजारी बनवू शकतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की टॉवेल किती वेळा धुवावा? अमेरिकेतील ‘द लाँड्री इव्हेंजलिस्ट’चे पॅट्रिक रिचर्डसन यांच्या मते, त्वचेचे आजार टाळण्यासाठी तुमचे टॉवेल वारंवार धुणे महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, काही तज्ञांच्या मते, टॉवेल तीनपेक्षा जास्त वेळा वापरल्यानंतर ते धुऊन वाळवला पाहिजेत. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही दररोज एकदा आंघोळ केली तर तिसऱ्या दिवशी वापरल्यानंतर त्याला धुवा. प्रत्येक वेळी कोरडे झाल्यानंतरच टॉवेल वापरा. ओला टॉवेल न वापरणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून तुमचे संरक्षण होईल. आता टॉवेलवर बॅक्टेरिया कसे येतात ते समजून घेऊ. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपले हात अनेक ठिकाणी स्पर्श करतात. या पृष्ठभागांवर असलेले जिवाणू, बुरशी किंवा विषाणू आपल्या हाताद्वारे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. त्याचबरोबर हवेत असलेले बॅक्टेरिया किंवा विषाणू देखील आपल्या त्वचेवर जमा होतात. आता जेव्हा आपण घरी पोहोचतो, आंघोळ करतो, आपला चेहरा आणि हात धुतो तेव्हा आपल्या त्वचेतून सर्व बॅक्टेरिया किंवा विषाणू निघत नाहीत. यातील काही जीवाणू पाणी कोरडे करताना टॉवेलच्या तंतूंना चिकटून राहतात. मग ते टॉवेलवर वाढू लागतात.

एकच टॉवेल न धुता वारंवार वापरला तर काय होईल? हात धुतल्यानंतर किंवा आंघोळ केल्यावर जेव्हा आपण आपले शरीर टॉवेलने घासून कोरडे करतो तेव्हा आपली मृत त्वचा देखील घाण सोबत चिकटते. आता हा टॉवेल आपण न धुता वापरला तर आपल्या मृत त्वचेसोबतच सूक्ष्मजीव पुन्हा आपल्या त्वचेपर्यंत पोहोचतात. जेव्हा हे वारंवार घडते तेव्हा आपल्या केसांच्या कूपांमध्ये त्रास होण्याची शक्यता वाढते. घाणेरडे टॉवेल्स न धुता वारंवार वापरल्याने त्वचेच्या आजाराची समस्या देखील उद्भवू शकते. इतकेच नाही तर एक गलिच्छ टॉवेल तुम्हाला एक्झामा, दाद किंवा पुरळ यासारख्या गंभीर त्वचेच्या आजारांना बळी पडू शकतो.life

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या