नळावर मेणबत्तीची कमाल (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 01 जुलै : पावसाळ्यात वीज जाण्याची समस्या खूप असते. लाइट गेली आपल्या कामी येते ती मेणबत्ती. मेणबत्ती मुळे अंधार असलेली जागा अगदी उजळून निघते. मेणबत्तीचा छोटासा प्रकाश खूप प्रकाश निर्माण करतो . अशा या मेणबत्ती पासून अनोखा असा किचन जुगाड पाहूया. मेणबत्ती तुम्ही प्रकाशासाठी, बर्थडे केकवर, घराच्या सजावटीत वापरली असेल. पण कधी नळावर मेणबत्तीचा वापर करून पाहिला आहे का? नळावर मेणबत्ती लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने मेणबत्तीचा हा जबरदस्त उपयोग करून दाखवला आहे.
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने पोस्ट केला आहे व्हिडीओ. ज्यात तिने नळावर मेणबत्ती लावण्याचा फायदा दाखवला आहे. Kitchen Jugaad Video - दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा; टळेल मोठा धोका आता तुम्हाला करायचं काय आहे. तर मेणबत्ती घेऊन ती तुम्हाला नळावर घासायची आहे. म्हणजे संपूर्ण नळाला मेणबत्ती लावून घ्यायची. त्याचं मेण नळाला लावायचं. आता याचा फायदा काय. तर बर्याच ठिकाणी खारं पाणी येतं. या पाण्यामुळे नळांवर पांढरे डाग येतात. नळ खराब होतात. मग ते वारंवार स्वच्छ करावे लागतात. पण नळाला मेणबत्ती लावल्याने नळावर पाणी राहातच नाही. परिणामी नळ पाण्यामुळे खराब होण्याचं टेन्शन नाही. Kitchen Jugaad Video - सिलेंडरवर ठेवा ओला कपडा; गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही
simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - या लेखातील माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)