नवी दिल्ली, 24 जून : सकाळी घाईघाईत टिफिन करताना किंवा दुपारी स्वयंपाक करताना अचानक सिलेंडर संपले की वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. पण आता गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही. सिलेंडरवर ओला कपडा ठेवल्यास कमाल होईल. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. एक ओला कापड सिलेंडरवर लावताच मोठी कमाल झाली. यामुळे सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शन नाही. Kitchen Jugaad Video - दूध गरम करताना त्यात साबण जरूर टाका; आहे जबरदस्त फायदा आता तुम्हाला करायचं काय आहे तर एक कपडा घेऊन तो ओला करायचा आहे. या ओल्या कपड्याने संपूर्ण सिलेंडर पुसून घ्यायचा आहे. व्हिडिओ मध्ये गृहिणीने सांगितल्यानुसार जिथपर्यंत सिलेंडरमधील गॅस संपला तिथपर्यंत सिलेंडरवरील पाणी लगेच सुकेल. म्हणजे सिलेंडरचा तो भाग कोरडा होईल. तर जिथपर्यंत गॅस आहे तो भाग ओला राहील. यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते समजेल. Kitchen Jugaad Video : किचन सिंकमध्ये कात्री टाका; पैशांची होईल बचत तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)