JOIN US
मराठी बातम्या / Viral / Kitchen Jugaad : चपाती करताना त्यावर नारळाची शेंडी नक्की लावा; का ते VIDEO मध्ये पाहा

Kitchen Jugaad : चपाती करताना त्यावर नारळाची शेंडी नक्की लावा; का ते VIDEO मध्ये पाहा

नवी दिल्ली, 02 जुलै : चपाती करताना नारळाचा वापर, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आतापर्यंत तुम्ही चपाती बरोबर नारळाची चटणी खाल्ली असेल. पण कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का? अशाच जबरदस्त किचन जुगाड चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने पोस्ट केला आहे व्हिडीओ. ज्यात तिने नारळाच्या एका भागाचा वापर चपातीवर करून दाखवला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जुलै : चपाती करताना नारळाचा वापर, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आतापर्यंत तुम्ही चपाती बरोबर नारळाची चटणी खाल्ली असेल. पण कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का? अशाच जबरदस्त किचन जुगाड चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने पोस्ट केला आहे व्हिडीओ. ज्यात तिने नारळाच्या एका भागाचा वापर चपातीवर करून दाखवला आहे. हा भाग म्हणजे नारळाची शेंडी.

सामान्यपणे आपण नारळ फोडला ही खोबरं असलेला भाग ठेवतो, त्याची शेंडी फेकून देतो. पण महिलेने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार नारळाचा ही शेंडी खूप कामाची आहे. चपाती करताना तुम्हाला याचा मोठा उपयोग होईल. आता तो कसा ते पाहूयात Kitchen Jugaad Video - कधी नळावर मेणबत्ती लावली आहे का? VIDEO मध्ये पाहा परिणाम आता तुम्हाला करायचा काय तर नारळाची शेंडी काढून घ्या. त्याची शेंडी एक असते, म्हणजे ते दोरे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ते सुटे करून घ्या. आता ते पुन्हा एकत्र करून एका दोरीने घट्ट बांधून घ्या. आता हा तुमचा घरगुती ब्रश तयार झाला. याचा वापर तुम्ही डोसा बनवताना तव्यावर आणि चपाती करताना चपातीवर तेल लावण्यासाठी करू शकता. शिवाय तुम्ही याने चपाती तव्यावर फिरवू शकता, दाब देऊन चपाती फुलवूही शकता. Kitchen Jugaad Video - टुथपेस्ट लावल्यानंतरच वापरा टोमॅटो; विचित्र आहे पण खूप फायद्याचं simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

(सूचना - या लेखातील माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या