नवी दिल्ली, 11 जून : बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टोमॅटोचा वापर करतो. पण तुम्ही कधी टोमॅटोला टूथपेस्ट लावून पाहिली आहे का? वाचायला, ऐकायला विचित्र वाटेल. पण टोमॅटोला टूथपेस्ट लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी हे याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने टोमॅटो आणि टूथपेस्टच्या जुगाडाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने टोमॅटोला टूथपेस्ट लावली आणि त्याचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.
व्हिडीओत गृहिणीने सांगितल्यानुसार यासाठी तुम्हाला लालबुंद म्हणजे चांगला पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटोचा वरील थोडासा भाग गोलाकार कापून घ्या. इतर उरलेला भाग तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरा. छोट्या भागाला टूथपेस्ट लावा. तुम्ही कोणतीही टूथपेस्ट वापरू शकता. टोमॅटोवर ही टूथपेस्ट पसरवा. Kitchen Jugaad Video - नवी असो वा जुनी, एकदा तरी चप्पल किसणीवर नक्की ‘किसा’; मोठ्या टेन्शनमधून होईल सुटका आता टूथपेस्ट लावलेल्या या टोमॅटोचं काय करायचं? तर हा टोमॅटो तुम्हाला तुमच्या त्वचेवर चोळायचा आहे. तुमची त्वचा जिथं काळवंडली आहे, तिथं हा टोमॅटो चोळा. महिलेने या व्हिडीओत तो हाताला चोळून दाखवला आहे. टोमॅटो जोपर्यंत त्वचेवर चोळता येतो तोपर्यंत तो चोळा. यानंतर पाण्याने हात धुवून घ्या. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला परिणाम स्पष्ट दिसून येईल. सुरुवातीला हात काळा पडलेला दिसतो. त्यावर टॅनिंग झालेलं आहे. उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे. पण जसा टूथपेस्ट लावलेला टोमॅटो त्वचेला लावला तशी कमालच झाली. त्वचेवरील टॅनिंग दूर झालं, त्वचेचा रंग उजळला आणि त्वचा चमकदार दिसू लागली. Kitchen Jugaad - फक्त 5 सेकंदात सोला ढिगभर लसूण तेही वॉशिंग मशीनमध्ये; कसं ते पाहा VIDEO टुथपेस्ट क्लिनिझिंगचं काम करतं आणि टोमॅटो मॉईश्चराईझरचं. टोमॅटोमध्ये असे घटक असतात जे त्वचेसाठी चांगले असतात. ज्याचा परिणाम तुम्ही या व्हिडीओत पाहिलाच असेल.
यूट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.