बंगळुरू, 01 मार्च : सध्याच्या काळात नोकरी आणि शिक्षणानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकं आपल्या मूळ गावातून शहरांमध्ये स्थलांतर करतात. शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यानं स्थलांतर करणाऱ्या बहुतेकांना नवीन घर खरेदी करणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये भाड्याच्या घराचा पर्याय समोर असतो. विशेषत: विद्यार्थी आणि नवीन नोकरीला लागलेल्यांसाठी हाच पर्याय जास्त योग्य आणि सोयीचा ठरतो. पण, दिल्ली-मुंबई-बेंगळुरूसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्वत:च्या मालकीचं तर सोडाच; पण भाड्यानं चांगलं घर मिळणं देखील कठीण झालं आहे. एखादं चांगलं घर मिळालं तरी त्याचं भाडं खूप जास्त असतं. या शिवाय भाडेतत्त्वावर घर मिळवण्यातही अनेक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. आजकाल सिक्युरिटी डिपॉझिट दिल्याशिवाय भाड्यानं घर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमधील एक व्यक्ती भाड्यानं घर शोधत असताना एवढी त्रस्त झाली की, तिनं घरासाठी चक्क आपली किडनी विकण्याची जाहिरात दिली आहे. ही जाहिरात बघून अनेकांना धक्का बसला आहे. ही जाहिरात लावणारी व्यक्ती कोण आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, राम्यक (Ramyakh) नावाच्या युजरनं ट्विटरवर या जाहिरातीचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल झाली असून, जाहिरात देणाऱ्याच्या क्रिएटिव्हिटीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. साधासुधा नाही हा चौथरा! म्हणतात, याच्यावर पाठ घासताच गायब होतात पाठीच्या वेदना बंगळुरुमध्ये घराच्या शोधात असलेल्या एका व्यक्तीला भाड्यानं योग्य घर मिळत नव्हतं. तेव्हा त्यानं एक अनोखी जाहिरात छापली. ‘घरमालकाला सिक्युरिटी डिपॉझिट देण्यासाठी पैसे नाहीत. म्हणूनच मला माझी डावी किडनी विकायची आहे.’ अशी जाहिरात या व्यक्तीनं तयार केली आणि ती रस्त्याच्याकडेला ठिकठिकाणी चिटकवली. ही जाहिरात थोड्याच वेळात व्हायरल झाली. जाहिरातील सुरुवातीच्या ओळी वाचून, व्यक्ती किडनी विकण्यासाठी तयार असल्याचं दिसतं. मात्र, ही जाहिरात बारकाईने वाचल्यानंतर त्यातील सत्य समोर येतं. रोडवरील सँडविच ते टपरीचा चहा, फॉरेन अधिकारी-नेत्यांचा इंडियन स्ट्रिट फूडवर ताव; म्हणाले… ही जाहिरात लक्षपूर्वक पाहिली असता त्यात पुढे लिहिले होतं, ‘मित्रांनो मी विनोद करतोय. इंदिरानगरमध्ये घर हवं आहे. प्रोफाइल पाहण्यासाठी हा बारकोड स्कॅन करा.’ म्हणजेच फक्त लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या व्यक्तीनं भन्नाट क्रिएटिव्ही वापरली असल्याचं लक्षात येतं. ही व्यक्ती बेंगळुरूमधील इंदिरानगर परिसरामध्ये घर शोधत आहे. त्याला योग्य घर सापडलं नाही. यानंतर त्यानं अशी जाहिरात छापून आणली.