टपरीवरचा चहा असो किंवा रोडवरील वडापाव, सँडविच, पाणीपुरी, डोसा असो... भारतातील स्ट्रिट फूडची तऱ्हाच न्यारी आहे. फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी लोकही इंडियन स्ट्रिट फूड आवडीने खातात. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
तुम्हाला आश्चर्य वाटेल परदेशातील नागरिकच नव्हे तर अधिकारी आणि नेतेही भारतीय स्ट्रिट फूडचे दिवाने आहेत. या वर्षात गेल्या दोन महिन्यात भारतात फॉरेन अधिकारी आणि नेत्याने स्ट्रिट फूडवर ताव मारला आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)
जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज दोन दिवस भारत दौऱ्यावर आले. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते रस्त्याच्या कडेला एका चहाच्या टपरीजवळ दिसले. (फोटो सौजन्य - ट्विटर)
भारतात आल्यानंतर त्यांना टपरीवरचा चहा पिण्याचा मोह आवरला नाही. रस्त्यावर उभं राहून ते टपरीवरचा चहा प्यायले. दिल्लीतील चाणक्य कॉर्नरवर ते चहाची चुस्की घेताना दिसले. (फोटो सौजन्य - ट्विटर)
भारताच्या टपरीवरील चहाची चव त्यांना इतकी आवडली की त्यांनी कौतुकही केलं. 'भारताची खरी चव आहे, तुम्ही चाखालयाच हवी'. असं ते म्हणाले. (फोटो सौजन्य - ट्विटर)
याआधी जानेवारी 2023 मध्ये भारतातील ब्रिटिश हाय कमिश्नर ॲलेक्स एलिस हे मुंबईत स्ट्रिट फूडचा आस्वाद घेताना दिसले होते. त्यांनीच हे फोटो सोशल मीडियावर शेअर कर 'या जेवायला' असं मराठी कॅप्शनही दिलं होतं. (फोटो सौजन्य - ट्विटर)
ॲलेक्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये ते मुंबईचे सॅंडविच आणि मिरची खाताना दिसले.