कित्येक लोक पाठीच्या वेदनेने त्रस्त आहेत. काही लोक घरच्या घरीच उपचार करतात. पेनकिलर घे, वेदनाशामक तेल किंवा मलमने मालिश कर. किती तरी उपाय केले जातात. तरी पाठीच्या वेदनेतून सुटका मिळाली नाही तर डॉक्टरांकडे धाव घेतली जाते.
पण असं एक ठिकाण जिथं लोक पाठीच्या वेदना झाल्यावर डॉक्टरांकडे जात नाहीत तर या चौथऱ्याजवळ जातात. हा चौथरा म्हणजे कित्येकांसाठी डॉक्टर झाला आहे.
या चौथऱ्याच्या चारही बाजूंनी आपली पाठ रगडल्याने पाठीच्या वेदना दूर होतात, असं वयस्कर लोकांनी सांगितल्याचं शहरातील नागरिक सांगतात. तीन दिवस सकाळ, ंसंध्याकाळ असं केल्यानंतर तीन दिवसांत आराम मिळतो, असं म्हटलं जातं.
हा असा चौथरा आहे राजस्थानच्या बिकानेरमध्ये. जस्सूसर गेटच्या आत एसडीपी स्कूलजवळ हा चौथरा आहे. जिथं दूरदूरहून लोक आपल्या उपचारासाठी येतात.
चौथऱ्यावर पाठ घासून पाठदुखी बरे होते, असा दावा लोकांचा आहे. न्यूज 18 लोकमत या दाव्याचं समर्थन करत नाही.