नवरीला घेऊन फरार झाले हल्लेखोर
जयपूर 25 जून : एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात नवरी आणि नवरदेव दोघंही मंदिरात गेले होते. दोघांचं लग्न एक दिवस आधीच झालं होतं. दोघंही देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले असतानाच तिथे काही सशस्त्र हल्लेखोर आले. हल्लेखोरांनी हल्ला करून वधूला पळवून नेलं. या प्रकरणी वधू-वर दोघांकडील लोकांनी सुभाष नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक पथक तयार करून शोध सुरू केला आहे. ही घटना राजस्थानच्या भीलवाडा येथील आहे. या जोडप्याने एक दिवसापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं होतं. दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. रितीरिवाजानुसार लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी आणि नवरदेव दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचले होते. दरम्यान, चोरटे तिथे पोहोचले आणि नवरीला उचलून पळून गेले. पती रवी नायक यांनी सांगितलं की, माझं शुक्रवारी लग्न झालं. हल्लेखोरांनी आम्हाला मारहाणही केली आणि नंतर माझ्या पत्नीला घेऊन गेले. अजूनही तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळेच आम्ही न्यायाच्या मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो. अजब प्रकरण! फेरे घेताना मंडपातच पडला नवरदेव; नवरीने तिथेच लग्न मोडलं, काय घडलं? दुसरीकडे रवी यांचे शेजारी ईश्वर यांनी सांगितलं की, त्यांना रवी नायक यांचा फोन आला होता की, कृषी उत्पन्न बाजारात फसवणूक केल्यानंतर तीन लोक धारदार हत्यारे घेऊन आले आणि वधूचं अपहरण केलं. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही. या प्रकरणी नातेवाईक आणि सासरच्या मंडळींनी दीपक नावाच्या व्यक्तीवर संशय असल्याचं सांगत गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विवाहितेचा शोध घेण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमप्रकरण असू शकतं, असा पोलिसांना संशय आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूचं अपहरण झाल्याची घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.