JOIN US
मराठी बातम्या / Viral / वृद्धाने धारदार शस्त्राने कापले गुप्तांग, असं काय घडलं? धक्कादाक कारण समोर

वृद्धाने धारदार शस्त्राने कापले गुप्तांग, असं काय घडलं? धक्कादाक कारण समोर

झारखंडमधील गुमला जिल्ह्यात एका 55 वर्षीय व्यक्तीने धारदार शस्त्राने गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रुपेशकुमार भगत (गुमला), 04 एप्रिल : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात एका 55 वर्षीय व्यक्तीने धारदार शस्त्राने गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. बसिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाफू गावातील ही घटना आहे. जखमी माधो सिंग यांना त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या उपआरोग्य केंद्रात दाखल केले.

यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना गुमला सदर रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. दरम्यान गुमला सदर रुग्णालयातही उपचार होत नसल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना रांचीच्या रिम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं.

शेजारी मृतदेह, रक्तबंबाळ अवस्थेत त्याने केला फोन; समोरचं दृष्य पाहून मित्रही हादरले, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

संबंधित बातम्या

माथो सिंग असे त्यांचे नाव आहे. यावेळी त्यांचे भाऊ किशोर सिंग म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भावाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तो विचित्र वागत होता. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक धारदार शस्त्राने वार करून त्यांचे गुप्तांग कापले.

यानंतर तो आरडाओरडा करू लागला. त्याची हाक ऐकून घरातील इतर सदस्य तेथे पोहोचले असता त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. जखमी माधो सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाईल हरवल्याचं सांगून रेल्वेत बोलावलं, जवानांकडून धक्कादायक कृत्य; पीडित महिलांचा आरोप

किशोर सिंह यांनी सांगितले की, गुमला सदर रुग्णालयात त्यांच्या भावाची गंभीर प्रकृती पाहता प्राथमिक उपचारानंतर रिम्सला रांचीला पाठवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, माथो घरी राहून शेती करत असे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र तो अचानक मानसिकदृष्ट्या खचला आणि विचित्र वागू लागला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या