पाटना, 10 जानेवारी : सोशल मीडियाची तर कमालचं आहे! (Social Media) येथे नेहमीच काहीतरी वेगळं बऱ्याचदा विचित्र असं काही पाहायला मिळत. येथे व्हिडीओ आणि फोटो तर खूप आवडीने पाहिले जातात. घटना एखाद्या गावातील असो की साता समुद्रा पार…सोशल मीडियावर याचे फोटो सहज उपलब्ध होतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथे एक नव्हे तर 7 जणं बाईकवर फिरताना दिसत आहे. तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. सुरुवातील तुम्ही या फोटोकडे लक्ष द्या. तुम्हाला हवं तेथून तुम्ही बाईकवर बसलेल्या लोकांची मोजणी करू शकता. या बाईकवर दोन..तीन..चार नाही तर सातजणं बसले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक वयोगटातील एक मुलगा, तरुण आणि महिला दिसतेय. अख्खं कुटुंब एका बाईटवर सामावलं आहे. बाईकच्या पुढील भागात तीन मुलं आहेत. यानंतर मुलाचं वडील..आणि पुन्हा एक मुलगा. यानंतर सर्वात मागे बसलेली आई आणि तिच्या मांडीवर एक छोटंसं बाळ. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. या बाईकच्या समोर पोलीस कर्मचारी हात जोडून उभे आहेत.
हे ही वाचा-
अवैध संबंधात हत्येचं गूढ; काकीनेच नोकराच्या मदतीने पुतण्याच्या हत्येचा रचला कट
व्हायरल होतोय फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो बिहारमधील ढाकाची आहे. हा ढाका बांग्लादेश नाही तर बिहारमधील आहे. ढाका नावाचं हे शहर बिहारमधील पूर्व चांपरण जिल्ह्यातील आहे. ढाका पोलीस ठाण्यातील कर्मचारी चंदन हात जोडून बाइक स्वाराच्या समोर उभे राहिले आहे. आणि हात जोडून असं न करण्याची विनंती करीत आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.