प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे येथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. यापैकी काही परंपराच आपल्याला माहित असतात. तर बऱ्याच परंपरांबद्दल तर आपल्याला माहिती देखील नसतं. चला अशाच काही भारतातील आगळ्या-वेगळ्या आणि विचित्र परंपरांबद्दल जाणून घेऊ या. 1. आरती आणि फूल नाही, तर टॉमॅटोने स्वागत साधारणपणे तुम्ही ऐकले असेलच की नवरदेवाचे स्वागत आरती आणि फुलांनी केले जाते. पण सगळीकडे असं होत नाही. उत्तर प्रदेशातील सरसौलमधील काही आदिवासी भागात वराचे आणि वऱ्हाड्यांचे स्वागत टोमॅटोने केले जाते. टोमॅटोच नाही, तर येथे प्रथा म्हणून नवरदेवाला शिव्याही दिल्या जातात. ही एक प्रकारे संयमाची परीक्षा असते आणि अशाप्रकारे सुरू झालेल्या नात्यात खूप प्रेम असतं असं ही म्हणतात. अजब लग्नाची गजब कहानी, एकाच वधूसाठी मंडपात पोहोचले दोन नवरदेव आणि… 2. लग्नाआधीच संन्यास घेण्याचा वराचा आग्रह लग्न करायचे की नाही करायचे? या कोंडीत अनेक लोक असतात. पण वराने लग्नाआधीच संन्यास घेण्याचा आग्रह धरला तर! ही एक विचित्र प्रथा आहे. तमिळ ब्राह्मण विवाहांमध्ये लग्नाआधी वराला संन्यासी होण्याचा आग्रह धरण्याची प्रथा आहे. यानंतर वधूचे वडील नवरदेवाकडे जाऊन त्याला बोलतात आणि त्याला घरगुती जीवनातील आवश्यकतेबद्दल सांगतात. ज्यानंतर नवरदेव लग्नासाठी तयार होतो, ज्यानंतर नववधूला मंडपात आणले जाते. 3. वधू डोक्यावर भांडे ठेवून आशीर्वाद घेते ही अनोखी प्रथा बिहारच्या काही भागात आहे. लग्नानंतर वधू पहिल्यांदा सासरच्या घरी येते तेव्हा सासू तिच्या डोक्यावर मातीचे भांडे ठेवते. या भांड्यांसह तिला ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. ही प्रथा विनोदी असेल, पण काही वर्षांपूर्वी भांडी समतोल करू न शकणाऱ्या महिलेला पेच सहन करावा लागला होता. 4. नवरदेव आणि नववधू दोघ्यांच्या आई लग्न पाहू शकत नाहीत कोणत्याही लग्नात वधू-वरांच्या आई या सर्वाधिक उत्साही असतात. पण त्यांना लग्नाला येण्यास मनाई केली तर? हे पारंपारिक बंगाली विवाहांमध्ये घडते. तिथे आई आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न पाहू शकत नाही. असे मानले जाते की आईच्या उपस्थितीने नवविवाहित जोडप्याच्या जीवनात वाईट परिणाम आणू शकतात. ही खूपच विचित्र परंपरा आहे. 5. नवरदेवाच्या आधी झाड किंवा कुत्र्यासोबत लग्न देशाच्या अनेक भागांमध्ये अशीही प्रथा आहे की वधूला झाड किंवा कुत्र्याशी लग्न करावे लागते. असे मानले जाते की मांगलिक मुलीचे लग्न झाडाशी किंवा कुत्र्याशी आधी केल्यास नवरदेवावरील संकटे दूर होतात. यानंतर त्यामुलीचे लग्न होऊ शकते. आता ही प्रथा हळूहळू कमी झाली आहे.
6. लग्नानंतर पती-पत्नी 1 वर्ष खोलीत बंद लग्नानंतर दोघांना काही दिवस एकटे राहायचे असते म्हणूनच ते हनिमून वगैरे प्लॅन करतात. पण काही आदिवासी समाजात पती-पत्नीने वर्षभर खोलीत बंद राहण्याची प्रथा आहे. लग्नानंतर दोघांना राहण्यासाठी जागा दिली जाते. त्यांना कोणाशीही भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी नसते. एक वर्षानंतर गावातील वडीलधारी मंडळी लग्नावर शिक्कामोर्तब करतात. यानंतर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून लग्न साजरे केले जाते.