JOIN US
मराठी बातम्या / Viral / सीमा हैदरवर संशय बळावला, 'कराची कनेक्शनचा' तपास सुरू

सीमा हैदरवर संशय बळावला, 'कराची कनेक्शनचा' तपास सुरू

सीमा चार वर्ष नवऱ्याशिवाय राहिली होती. त्या काळात तिने ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेसोबत काम करायला सुरुवात तर केली नाही ना?

जाहिरात

सीमा मागील अनेक वर्ष पाकिस्तानातील सर्वात मोठं शहर असलेल्या कराचीत राहायची.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जुलै : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं कोडं उलगडण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा सध्या अलर्टवर आहे. ती गुप्तहेर असल्याचा संशय दिवसेंदिवस बळावतोय. खरंच तसं असेल तर तिने कटाच्याबाजूने पावलं उचलण्याआधी तापास यंत्रणांना तिच्या मुसक्या आवळ्याच्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम तिचं कराची कनेक्शन आहे का? हे उघड करायचंय. म्हणूनच चौकशीत सीमाला वारंवार सारखेच प्रश्न विचारण्यात येत आहेत. ज्यामुळे ती अडखळून सत्य सांगेल. सीमा हैदरने चौकशीत सांगितलं की, तिचा नवरा गुलाम हैदर याच्यापासून ती जवळपास चार वर्षे दूर राहिली आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिली होती. मात्र तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, सीमा मागील अनेक वर्ष पाकिस्तानातील सर्वात मोठं शहर असलेल्या कराचीतच राहायची. म्हणूनच एटीएसला सर्वात आधी तिचं या शहराशी असलेलं कनेक्शन शोधायचं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमाचा नवरा गुलाम हैदर याने दावा केला की, तो कराचीमध्ये टाईल्स लावण्याचं काम करायचा. त्यानंतर 2019 साली तो कामासाठी सौदी अरेबियाला गेला. त्यामुळे नवरा परदेशी गेल्यावर सीमा तिथेच राहिली का? कोणासोबत राहिली? की, आणखी कुठे राहिली? याचा शोध एसटीएसचे अधिकारी घेत आहेत. कारण आतापर्यंतच्या चौकशीत याबाबत सीमाने दिलेली उत्तरं असमाधानकारक आहेत. सचिन हनीट्रॅपमध्ये अडकला? PUBG आयडीतून सीमाचं नवं सत्य समोर! महत्त्वाचं म्हणजे लग्न झालेलं असताना, चार मुलं असताना, खेळात होणाऱ्या प्रेमापोटी एका सर्वसामान्य तरुणासाठी आपल्या देशाचा कट्टर विरोधक असलेल्या देशात अवैधरीत्या घुसण्याचं धाडस करणं, हेच अत्यंत संशयास्पद आहे. त्यामुळे सीमा जेव्हा चार वर्ष नवऱ्याशिवाय राहिली होती. त्या काळात तिने ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेसोबत काम करायला सुरुवात तर केली नाही ना? असा संशय तपास यंत्रणांना अगदी सुरुवातीपासूनच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या