JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! चक्क नदीच्या खालून धावली मेट्रो, भारतीय रेल्वेचा यशस्वी प्रयोग पाहा VIDEO

काय सांगता! चक्क नदीच्या खालून धावली मेट्रो, भारतीय रेल्वेचा यशस्वी प्रयोग पाहा VIDEO

काल कोलकाता मेट्रोने इतिहास रचला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो हुगळी नदीखाली धावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 एप्रिल : मागच्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत बरेच बदल होत आहेत. दरम्यान कोलकाता मेट्रो विभागाकडून एक महत्वाची घटना घडली आहे. काल कोलकाता मेट्रोने इतिहास रचला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो हुगळी नदीखाली धावली.

मेट्रोने नदीखालून प्रवास पूर्ण करण्याची ही भारतात पहिलीच वेळ आहे. मेट्रोच्या डब्यानी 11.55 मिनिटांत हुगळी नदी पार केली. यावेळी मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी उदय कुमार रेड्डीही उपस्थित होते. ट्रेन हावडा स्टेशनवर येताच अधिकाऱ्यांनी पूजन केले.

गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल, स्वतःच्या शरीराबाबत घेतला असा निर्णय

संबंधित बातम्या

दरम्यान, महाव्यवस्थापक पी उदय कुमार रेड्डी म्हणाले की, हावडा मैदान ते एस्प्लेनेड अशी चाचणी पुढील 7 महिने सुरू राहणार आहे. त्यानंतर या विभागावर नियमित मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

जाहिरात

हावडा मैदान ते एस्प्लेनेड या 4.8 किमीच्या भूमिगत लवकरच ट्रायल रन सुरू होणार असल्याची माहिती आहे. या विभागातील मेट्रो सेवा यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. हा विभाग सुरू झाल्यानंतर हावडा हे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन बनणार आहे.

हुगळी नदीखालील 520 मीटरचा भाग मेट्रो 45 सेकंदात कव्हर करू शकते, असे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर नदीच्या खाली 32 मीटर लांबीचा बोगदाही बनवण्यात आला आहे.

जाहिरात
आलिशान घराचा मालक असूनही राहतो गॅरेजमध्ये; इस्टेट एजंट तरुणाचा अजब निर्णय

बोगद्यातील पाण्याचा प्रवाह आणि गळती रोखण्यासाठी अनेक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आहे. फ्लाय अॅश आणि मायक्रो सिलिका यापासून बनवलेले काँक्रीट मिश्रण या भागात पाणी शिरण्यापासून रोखण्यासाठी वापरण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या