जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आलिशान घराचा मालक असूनही राहतो गॅरेजमध्ये; इस्टेट एजंट तरुणाचा अजब निर्णय

आलिशान घराचा मालक असूनही राहतो गॅरेजमध्ये; इस्टेट एजंट तरुणाचा अजब निर्णय

आलिशान घराचा मालक असूनही राहतो गॅरेजमध्ये; इस्टेट एजंट तरुणाचा अजब निर्णय

तो इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करतो. असं सगळं असूनही तो राहतो घराच्या गॅरेजमध्ये. हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल; पण त्यासाठी त्याची कारणंही निराळी आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 एप्रिल: अमेरिकेसारख्या देशात स्वतःचा आलिशान बंगला असेल, तर कोणाला नाही आवडणार? कीटन वॉन या तरुणाकडे अवघ्या 19व्या वर्षी असा बंगला आहे. तो इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करतो. असं सगळं असूनही तो राहतो घराच्या गॅरेजमध्ये. हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल; पण त्यासाठी त्याची कारणंही निराळी आहेत. सध्याच्या काळात पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. विविध क्षेत्रांमध्ये स्पर्धाही खूप असते. अशा परिस्थितीत पैसे कमावण्यासाठी प्रत्येक जण विविध मार्ग शोधून काढतात. प्रत्येक वेळी त्याला यश मिळेलच असं नाही; मात्र काही वेळा काही अनोख्या आणि विचित्र कल्पनाही काम करतात व पैसे मिळवून देतात. अमेरिकेतल्या तरुणानं अशीच एक युक्ती केली आहे. स्वतःचा आलिशान बंगला त्याने भाड्याने दिला आहे आणि तो स्वतः गॅरेजमध्ये राहतो आहे. गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल, स्वतःच्या शरीराबाबत घेतला असा निर्णय ‘द सन’ वेबसाइटच्या वृत्तानुसार, 19 वर्षांचा कीटन वॉन (Keaton Vaughn) रिअल इस्टेट एजंट आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात त्याच्याकडे स्वतःचा आलिशान बंगला आहे. असं असूनही तो घराच्या गॅरेजमध्ये राहतो. त्यामागे काही अपरिहार्यता नसून, तो हे जाणूनबुजून करतो आहे. त्यानं घराच्या गॅरेजचं रिनोव्हेशन केलं आणि तो तिथे राहू लागला. बंगला त्यानं भाड्यानं दिला आहे. असं केल्यानं त्याचा खर्च खूप कमी झाला आहे. तसंच तो थोडे पैसे कमावूही शकतो आहे. ‘द सन’च्या वृत्तानुसार, कीटन याने टिकटॉकवर त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने प्रेक्षकांना त्याच्या घराची सैर करवून आणली आणि घर भाड्याने देण्याचं कारणही सांगितलं. त्या घराचा भाडेकरू कीटनला भाड्यापोटी 2 हजार डॉलर (1.6 लाख रुपये) देतो. त्या घरासाठी काढलेल्या कर्जाचा मासिक हप्ता 1800 डॉलर्स (1.4 लाख रुपये) इतका आहे. म्हणजेच काहीही न करता त्याला दर महिन्याला 200 डॉलर्स (16 हजार रुपये) एवढी कमाई होत आहे. घराच्या कर्जाचा हप्ता फिटून जास्तीचे पैसे तो कमावत असल्यानं त्यानं गॅरेजमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय; मात्र प्रेक्षकांनी त्याला मोठ्या घरात राहण्याची इच्छा होत नाही का असं विचारलं. तेव्हा इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या घरात राहण्याची फारशी गरज नसून, छोट्या जागेत राहूनही काम भागत असल्याचं त्यानं सांगितलं. पैसे कमावण्याचा त्याचा मार्ग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात