सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 11जून : तुम्ही अनेकांना बोलताना ऐकलं असेल की तुला तर मी एक ‘फुटी कवडी पण देणार नाही’. अनेकदा लोक रागाने किंवा तिरस्काराने असं म्हणतात. पण या म्हणीचा खरा अर्थ आहे का? असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? फुटी कवडी म्हणजे नक्की काय किंवा या कवडीची काही किंमत आहे का? असा कधी प्रश्न उपस्थीत झालाय? आज आम्ही तुम्हाला जुन्या काळात विनिमय प्रणालीमध्ये वापरल्या जाणार्या चलनांबद्दल सविस्तरपणे सांगणार आहेत. यामध्ये एक रुपया कसा तयार होतो किंवा रुपयापेक्षा आणखी कशाची किंमत होती किंवा काय चलनात होतं, याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या कारमध्ये चुकून रिवर्स गेअर टाकला तर काय होईल? वास्तविक, जुन्या काळात फुटी कवडी हा सर्वात लहान चलन होता. आजच्या जगात, सर्वात लहान रक्कम म्हणजे एक रुपयाचे नाणे. त्याचप्रमाणे भारतीय इतिहासातील सर्वात लहान चलन हे कवडी होते. प्राचीन भारतीय चलनांचा इतिहास खूप जुना आहे. चला जाणून घेऊया. तुम्हाला एका पैशाचा अर्थ माहित आहे का? प्राचीन इतिहासात, सर्वात लहान चलन म्हणजे फुटी कवडी.तीन फुटी कवडीची मिळून एक कवडी होते. त्यानंतर दहा कवडी मिळून एक दमडी तयार होते. एवढेच नाही तर दमडीवरही मुद्रा होत्या. दोन दमडींची मिळून एक धेला होतो. Viral News : बिबट्या दररोज शेतात येऊन करायचा असं काम, CCTV शेतकऱ्याचं उडालं भान तुम्ही अनेकवेळा लोकांना हे देखील बोलताना ऐकलं असेल की ‘तुला दमडीचीही किंमत नाही’ किंवा ‘दिड दमडीचा तू’. या शब्दात वापरली जाणारी दमडी ही अशी वरील प्रमाणे तयार होते. चला आपण या चलनाबद्दल आणखी जाणून घेऊ 3 फूटी कवडी = 1 पूर्ण कवडी 10 पूर्ण कवडी = 1 दमडी 10 दमडी = 1 धेला 1.5 ढेला = 1 पाई 3 पाई = 1 जुना पैसा 4 जुने पैसे = 1 आना 16 आणे = 1 रुपया मात्र, काळानुसार गोष्टीही बदलल्या. आता बाजारात सर्वात कमी किंमत फक्त 1रुपयाची आहे. चलनाचा हा इतिहास सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कौडी, दमडी, धेला अजूनही तुम्हाला काही दुकानात पाहायला मिळतील, ज्याची किंमत आजच्या काळात खूप जास्त आहे. ती ऐतिहासिक वस्तू असल्यामुळे त्याला जास्त मान आणि महत्व आहे.
वीरेंद्र जाट नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एक लाख 64 हजार लाईक्स आले आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कवडीपासून डॉलरपर्यंत रुपयाची सुरुवात.”