JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाह! तहानलेल्या सापानं प्यायलं चक्क ओंजळीतून पाणी, वनाधिकाऱ्याचा VIDEO VIRAL

वाह! तहानलेल्या सापानं प्यायलं चक्क ओंजळीतून पाणी, वनाधिकाऱ्याचा VIDEO VIRAL

साप तसा सगळ्यांनाच भीतीदायक जीव वाटतो. मात्र या वनाधिकाऱ्यानं सापाबाबत दाखवलेली माणुसकी ह्रद्यस्पर्शी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (social media) विविध प्राणी-पक्ष्यांचे व्हिडिओज (animal videos) कायम व्हायरल होत असतात. कधी माणूस आणि प्राण्यामधलं प्रेम तर कधी प्राण्यांनी दाखवलेली हुशारी आणि चातुर्य या व्हिडिओजमध्ये असतं. आता असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल (old video viral on social media) होत आहे. हा व्हिडिओ आहे एक माणूस आणि साप यांचा(man and cobra). या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं विषारी कोब्राला चक्क आपल्या हातानं पाणी पाजलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी (IFS Officer Susanta Nanda) ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केल्यावर हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हिडिओत दिसतं आहे, की वन अधिकारी अगदी आरामात तहानलेल्या कोब्राला (thirsty snake) पाणी पाजत आहेत. कोब्राही अतिशय समाधानानं आणि निवांतपणे पाणी पितो आहे.

संबंधित बातम्या

सुसांता यांनी व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलं, ‘प्रेम आणि पाणी, आयुष्यातल्या दोन सर्वाधिक चांगल्या गोष्टी.’ हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. अनेक युजर्सनी या वनाधिकाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. 1900 हून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि 2 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. ज्याप्रकारे आपल्या जीवाची पर्वा न करता हे वनाधिकारी कोब्रापर्यंत पोहोचले आणि त्यांनी विषारी सापाला (poisonous snake) पाणी पाजलं ते पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हेही वाचा पिंजऱ्याजवळ जाताच सिंहाने महिलेवर घेतली झडप आणि भलतचं घडलं; पाहा VIDEO मात्र अनेकांनी हेसुद्धा लिहिलं, की हा व्हिडिओ एका सूचनेसह शेअर केला जावा, की लोकांनी सापांना जवळ येऊ द्यायला नको. सर्व सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगूनच असं केलं पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या