JOIN US
मराठी बातम्या / Viral / आता 2023 सालात ताजमहाल बांधायचा झाला तर किती खर्च येईल?

आता 2023 सालात ताजमहाल बांधायचा झाला तर किती खर्च येईल?

पांढऱ्या संगमरवरात बांधलेल्या या ताजमहालासाठी त्या वेळी 32 दशलक्ष रुपये खर्च करण्यात आले होते, असा एक अंदाज आहे.

जाहिरात

ताजमहाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 16 जून : जगातल्या सात आश्चर्यांमध्ये भारतातल्या ताजमहाल या वास्तूला स्थान मिळालं आहे. आग्रा शहरातला हा ताजमहाल म्हणजे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. तो बांधण्यासाठी कामगारांनी अनेक वर्षं काम केलं. तसंच बांधकामाचा खर्चही पुष्कळ झाला. ही वास्तू आजच्या काळात म्हणजेच 2023मध्ये बांधली गेली, तर त्यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज घेऊ या. उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात असलेला ताजमहाल म्हणजे सुंदर ऐतिहासिक ठिकाण आहे. जगातल्या काही प्राचीन व देखण्या वास्तूंमध्ये या वास्तूचा समावेश होतो. शाहजहानने त्याची प्रिय पत्नी मुमताज हिच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहाल या वास्तूची निर्मिती केली. त्याला मुमताज मकबरा असंही म्हटलं जातं.  त्याची भव्यता व सौंदर्यामुळे जगभरातले पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. 300 वर्षे जुन्या बंद थिएटरमधील ‘ती’ भयावह 10 मिनिटं, आत दिसलं असं भयानक दृश्य; पाहा VIDEO या महालाचं बांधकाम अनेक वर्षं चाललं. हिंदू, मुघल आणि पर्शियन स्थापत्यशैलीचा प्रभाव या बांधकामावर आहे. पांढरा संगमरवर व इतर काही वैशिष्ट्यपूर्ण दगडांच्या साह्याने बांधकाम करून त्यावर सुंदर नक्षी रेखाटण्यात आली आहे. त्यासाठी त्या काळी खर्चही खूप आला होता. तो 2023मध्ये बांधायचा झाला, तर किती खर्च येईल, याचा विचार करू शकता का? 400-500 वर्षांपूर्वी हा ताजमहाल बांधण्यासाठी लाखो रुपये लागले होते. ताजमहालाच्या बांधकामात 28 प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत, असा दावा केला जातो. हे सर्व दगड व पांढरा संगमरवर ताजमहालाची शोभा वाढवतात. यासाठी वापरण्यात आलेला पांढरा संगमरवर अतिशय महाग होता. तसंच त्यावरचं नक्षीकाम व कलाकुसर यासाठीही खूप खर्च करण्यात आला होता. ऑगस्टबाबत मोठी भविष्यवाणी! ‘तो’ पुन्हा येतोय, टाइम ट्रॅव्हलरचा खळबळजनक दावा पांढऱ्या संगमरवरात बांधलेल्या या ताजमहालासाठी त्या वेळी 32 दशलक्ष रुपये खर्च करण्यात आले होते, असा एक अंदाज आहे. 1653मध्ये हा ताजमहाल बांधून पूर्ण झाला. या महालाच्या बाजूला बगीचे तयार करण्यात आले आहेत. ताजमहालचं मुख्य आकर्षण मुमताज बेगम यांची कबर हे आहे. ती सुंदर पद्धतीने बांधण्यात आली आहे. 2023मध्ये असा ताजमहाल बांधायचा झाला, तर अंदाजे 70 अब्ज रुपये (1 अब्ज डॉलर) खर्च येऊ शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या