भविष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. कुणी आपलं हात दाखवतं, कुणी आपल्या जन्मावरून आपलं भविष्य जाणून घेतं. पण ज्योतिषांशिवाय असे लोक जे स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवतात, तेसुद्धा अनेक भविष्यवाणी करतात.
टाइम ट्रॅव्हलर म्हणजे असे लोक जे भविष्यात जाऊन आल्याचा दावा करतात आणि भविष्यातील घडामोडी, संकटांबाबत लोकांना सावध करतात.
अशाच एका टाइम टॅव्हलरने आपण 2858 सालातून परत आल्याचा दावा केला आहे. म्हणजे त्याच्या मते, तो 835 वर्षांनंतरचं जग पाहून आला आहे. @darknesstimetravel म्हणून सोशल मीडियावर ही व्यक्ती आहे.
या व्यक्तीने सोशल मीडियावर ऑगस्टमध्ये होणाऱ्या घटनेबाबत माहिती दिली आहे. दीड कोटी वर्षांपूर्वी विलुप्त झालेला हा जीव. जो जीव पुन्हा येतो आहे, जो धरतीवर डायनोसॉरसोबत राहायचा पण आता फक्त त्याचे जीवाश्म माणसांजवळ आहेत.
हा जीव म्हणजे मेगालोडंस. हा एक खतरनाक शार्क आहे. मरीना ट्रेंचजवळ चार मेगालोडन मिळतील. यानंतर एकएक करत विलुप्त झालेल्या प्रजाती पुन्हा येतील, असं या टाइम ट्रॅव्हलरने सांगितलं आहे.