बाईक घेणारं सामान्य कपल चर्चेत.
मुंबई, 13 ऑक्टोबर : सध्या बऱ्याच लोकांकडे स्वतःच्या गाड्या आहेत. कार नाही तर किमान बाईक , स्कूटी तर असतेच. त्यामुळे गाडी घेणं हे काही नवं राहिलं नाही. असं असलं तरी सध्या गाडी घेणाऱ्या एका कपल चा व्हिडीओ मात्र तुफान व्हायरल होतो आहे. याला कारणही तसं खास आहे. आपली बाईक घ्यायला हे दाम्पत्य शोरूममध्ये गेलं. तिथं बाईकशेजारी उभ्या राहिलेल्या वाईफसोबत नवऱ्याने असं काही केलं की व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारणही हेच आहे. स्वतःच्या मालकीची गाडी असणं हे सध्या सामान्य असलं तरी अनेकांच्या खिशाला ते आजही परवडण्यासारखं नाही. पण तरी गाडी घेण्याचं स्वप्नं प्रत्येकाचं असतं आणि त्यापैकी काही लोक स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी धडपड करतात. अगदी पै पै जमवून का होईना हे स्वप्न साकार करतात. या व्हिडीओतील दाम्पत्याला पाहूनही त्यांनी गाडीचं स्वप्न असंच साकार केलं असावं हे दिसतं. हे वाचा - हसावं की रडावं! ‘लग्न म्हणजे काय?’ परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर वाचून चक्रावून जाल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता अगदी साधी साडी नेसलेली अगदी भोळीभाबडी महिला आणि तिचा भोळाभाबडा नवरा, दोघंही गाडीच्या शोरूममध्ये आहेत. त्यांनी नवीकोरी बाईक घेतली आहे. कुणीतरी त्यांचा व्हिडीओ शूट करतं आहे. आता गाडी म्हणजे कुटुंब, घरातील एक नवा सदस्य. त्यामुळे तिची पूजा केली जाते, तिला हार घातला जातो. या गाडीचा मालकही शोरूममध्ये हातात फुलांचा हार घेऊन येताना दिसतो. त्यावेळी त्याची बायको या बाईकशेजारी उभी असते. बाईकसोबत फोटो काढत असते.
आता हार घेऊन आलेल्या व्यक्तीने गाडीला हार घालणं अपेक्षित होतं. पण तो बाईकशेजारी उभ्या असलेल्या आपल्या बायकोला हार घालायला जातो. हे दृश्य पाहून जसं आपल्याला हसू येतं, तसं त्या व्यक्तीच्या बायकोसह तिथं उपस्थित प्रत्येकजण हसू लागतो. त्यानंतर तो बायकोच्या गळ्यातील हार काढून त्या बाईकला घालतो. हे वाचा - VIDEO - या 2 महिलांमध्ये काय नातं असेल सांगू शकाल? लिहून घ्या ओळखण्यात तुम्हीसुद्धा व्हाल फेल ट्विटर युझर योगिता भयानाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. व्हिडीओतील संभाषण मराठीत आहे. यावरून हे कपल महाराष्ट्रीयन असावं. पण हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर कुणी यामागील भावना समजून सांगितली आहे. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो. त्यामुळे या यशाची भागीदार ती महिलाही असते, हा त्या व्यक्तीचा भोळेपणा नाही तर त्यांचं आयुष्य असलेल्या बायकोप्रती प्रेम आणि आदराची भावना आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.