जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हसावं की रडावं! 'लग्न म्हणजे काय?' परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर वाचून चक्रावून जाल

हसावं की रडावं! 'लग्न म्हणजे काय?' परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर वाचून चक्रावून जाल

marriage

marriage

व्हायरल होत असलेला उत्तरपत्रिकेचा फोटो चाचणी परीक्षेचा असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, लग्न म्हणजे काय?

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 13 ऑक्टोबर : शाळा, कॉलेजमध्ये असताना अनेक विद्यार्थ्यांना सर्वात जास्त टेन्शन येतं ते परीक्षेचं. पेपर सोपा जाईल ना? ज्याचा अभ्यास केलाय तेच येईल ना? परीक्षेत उत्तीर्ण होऊ ना? असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. काहीजण तर परीक्षेत उत्तीर्ण व्हावे, यासाठी कॉपी करण्याचा प्रयत्नही करतात. तर, अनेकदा मित्रांकडून सल्ला दिला जातो की, ‘फक्त तू उत्तरपत्रिका काळी करून ये, म्हणजेच उत्तरपत्रिकेत काहीतरी लिहून ये.’ मात्र, एका विद्यार्थ्याने परीक्षेत त्याला विचारलेल्या प्रश्नाचं असं काही उत्तर लिहिलं, जे वाचल्यानंतर पेपर तपासणारा शिक्षकच काय, तुम्हालाही हसावं का रडावं, असा प्रश्न पडेल. शालेय दिवसात मुलं उत्तीर्ण होण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या अवलंबतात. काहीजण तर परीक्षेत उत्तराऐवजी सिनेमाची गाणीही लिहितात. तर काही मुलं असं उत्तर लिहितात की, जे पाहून शिक्षकांच्या डोळ्यांसमोर दिवसाही तारे चमकतात! नुकतीच अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. ही पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. व्हायरल होत असलेला उत्तरपत्रिकेचा फोटो चाचणी परीक्षेचा असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, लग्न म्हणजे काय? या प्रश्नाचं मुलं किती कल्पकतेनं उत्तर देतात, हे शिक्षकांना पहायचं होतं. परंतु, ज्या मुलाचा पेपर व्हायरल होत आहे, त्यानं असं काही उत्तर लिहिलं आहे, की ते वाचून लोक आश्चर्यचकित होत आहेत. ड्यूटीच्या वेळी झोपताना पकडला गेला, दिलेलं कारण वाचून थांबणार नाही हसू या उत्तरपत्रिकेचा फोटो ट्विटवर @srpdaa नावाच्या हँडलवरून ट्विट केला आहे. शिक्षकाने या उत्तराला शून्य मार्क दिले असल्याचं दिसत आहे. पण भलेही शिक्षकांना हा निबंध आवडला नसला, तरी सोशल मीडियातील अनेक युजर्सना तो खूप आवडला असून, त्यांनी त्यावर मजेशीर कमेंटसुद्धा दिल्यात.

    जाहिरात

    त्या मुलानी इंग्रजीत जे उत्तर लिहिलंय त्याचा मराठी अर्थ असा, की ‘एखाद्या मुलीचे आई-वडील जेव्हा तिला सांगतात की तू आता ‘मोठी झाली आहेस.’ आता आम्ही तुला जेवायला घालू शकत नाही. त्यामुळे तू असा पुरूष शोध जो तुला खाऊ घालेल. मग ती अशा मुलाला भेटते ज्याचे आई-वडील त्याला सांगत असतात की आता तू एवढा मोठा झाला आहेस, आता तरी लग्न करून घे. ते दोघं भेटून एकमेकांसोबत बोलतात आणि आनंदी होऊन एकत्र राहण्याचा म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर मुलांना जन्म देण्यासाठी ते Nonsense करायला सुरुवात करतात.’ बिअर पिऊन मुलांना शिकवत होता शिक्षक, Viral Video पाहून लोकांकडून संताप व्यक्त शिक्षकाने त्या मुलाला शून्य मार्क दिलेच आहेत आणि आपल्याला येऊन भेटावं असा शेराही पेपरवर लिहिला आहे. मुलानं दिलेलं उत्तर वाचून बहुतेक युजर्सना त्यांचं हसू आवरता आलं नाही, तर काही यूजर्स म्हणाले की, ‘जर मी या मुलाचा शिक्षक असतो, तर मी त्याला 10 पैकी 10 मार्क नक्कीच दिले असते.’ एका युजरने कमेंट दिली आहे की, ‘या मुलानं काहीही चुकीचं लिहिलेलं नाही.’ उत्तर पत्रिकेचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर मजेशीर कमेंट येत असून याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा शाळेतील परीक्षा काही मुलं किती गांभीर्याने घेतात, हे सुद्धा समोर आलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात