जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - या 2 महिलांमध्ये काय नातं असेल सांगू शकाल? लिहून घ्या ओळखण्यात तुम्हीसुद्धा व्हाल फेल

VIDEO - या 2 महिलांमध्ये काय नातं असेल सांगू शकाल? लिहून घ्या ओळखण्यात तुम्हीसुद्धा व्हाल फेल

दोन महिलांच्या फोटोमागील सत्य वेगळंच.

दोन महिलांच्या फोटोमागील सत्य वेगळंच.

या दोन महिलांबाबत सत्य समजल्यानंतर अनेक जण चक्रावले आहेत.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 11 ऑक्टोबर : सोशल मीडियावर हे दोन फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोत महिला आहेत. ज्यांच्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. या दोन महिलांमध्ये नेमकं काय नातं असेल, याचा अंदाज बांधला जातो आहे. कुणी यांना आई-मुलगी म्हटलं आहे. तर कुणी बहिणी म्हटलं. पण प्रत्यक्षात या महिलांचं सत्य वेगळंच आहे, जे समजताच सर्वजण शॉक झाले आहेत. तुम्हीसुद्धा हे सत्य समजल्यानंतर हैराण व्हाल. आधी तुम्ही हे दोन्ही फोटो नीट पाहा आणि तुम्हाला काय वाटतं? या महिलांमध्ये काय नातं असेल? इतरांप्रमाणे तुम्हीसुद्धा बहिणी, आई-मुलगी, सासू-सून, नंनद-भावजय, जावा, मावशी-भाची, आत्या-भाची, काकी-पुतणी, मामी-भाची, अगदी आजी-नातंही….. अशी एक ना दोन नात्यांची लिस्ट तुम्ही सांगाल. पण आम्ही तुम्हाला सांगतो असं कोणतंही नातं या महिलांमध्ये नाही. हे वाचा -  सुंदर दिसणं किती वाईट असू शकतं, हे या तरुणीची कहाणी ऐकून तुम्हाला जाणवेल महिलेने आपला व्हिडीओ आपल्या टिकटॉवर शेअर केला आहे. ज्यात या दोन महिलांच्या फोटोमागील सत्य उलगडलं आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट केला नसता तर या फोटोमागील रिअल स्टोरी समजलीच नसती. खरंतर महिलेने सत्य सांगूनही लोक चक्रावले आहेत. याचं कारणही तसंच आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

कारण या फोटोत दिसणाऱ्या या दोन महिला प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या महिला नाहीच. तर या दोन्ही महिला म्हणजे एकच महिला आहे. हो बरोबर वाचलंत तुम्ही. या दोन्ही महिला एकच महिला आहे.  द सन च्या रिपोर्टनुसार या महिलेचं नाव कोल वाटर्ज आहे. कोल अमेरिकेत राहते. कोलने आपल्या टिकटॉकवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत ती बिना मेकअपची, चेक शर्टमध्ये आहे. ज्यात ती वयस्कर दिसत आहे. तर त्यानंतर तिचा मेकओव्हर सुरू होते. ज्यात ती टाइट ब्लॅक ड्रेसमध्ये डोळ्यांना आयलॅश लावते. मेकअप करते आणि ती तरुण दिसू लागते. हे वाचा -  Optical Illusion : घराच्या अंगणात लपलाय चोर, हुशार असाल तर ओळखा चोराचा खरा चेहरा! टिकटॉक भारतात बॅन असल्याने तिचा तो व्हिडीओ आपण पाहू शकत नाही. पण तिचे असेच इतर व्हिडीओही व्हायरल होत आहेत. ज्यात ती आपल्या चीकबोन्सवर फेस टेप लावून आपले गाल लिफ्ट करताना दिसते.

हे व्हिडीओ पाहूनही लोकांना यावर विश्वास बसत नाही आहे.  या दोन महिला एक असूच शकत नाही, असं युझर्सनी म्हटलं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात