JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवऱ्याने दिलं नाही एकही गिफ्ट, बायको सुडाने पेटली; पतीच्या वाढदिवसालाच...

नवऱ्याने दिलं नाही एकही गिफ्ट, बायको सुडाने पेटली; पतीच्या वाढदिवसालाच...

पतीने एकदाही गिफ्ट न दिल्याने रागावलेल्या महिलेने घेतला असा निर्णय.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नवी दिल्ली, 13 एप्रिल :  आपल्या जोडीदारा ने आपल्याला गिफ्ट द्यावं, असं बऱ्याच तरुणींना वाटतं. मला माझा बॉयफ्रेंड किंवा नवरा कधीच गिफ्ट देत नाही, अशी तक्रारही बऱ्याच जणींची असते. लाइफ पार्टरनने गिफ्ट दिलं नाही म्हणून कुणी रूसून फुगून बसतं, तर कुणी अबोला धरतं. प्रत्येकाची नवऱ्याला शिक्षा देण्याची स्टाईल वेगळी. अशीच एक महिला जिच्या नवऱ्यानेही तिला एकदाही गिफ्ट दिलं नाही. आता ती सुडाच्या भावनेने पेटली.

एक महिला mumsnet वर व्यक्त झाली आहे.  तिने नवऱ्याबाबतची आपली ही तक्रार थेट सोशल मीडियावर मांडली. तिला तिच्या नवऱ्याने कधीच गिफ्ट दिलं नाही. नुकताच तिचा वाढदिवस झाला, तेव्हाही तिला गिफ्ट मिळालं नाही. ती म्हणाली, माझ्या पतीने मला कधीच गिफ्ट दिलं नाही. त्याचा दिवस खास बनवण्यासाठी मी प्रत्येक वेळी काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स विचार करत असते. त्याच्या या वृत्तीने मी दुखावले आहे, पण तो माझा नवरा आहे.'

त्यामुळे आता तिने नवऱ्याचा बदला घेण्याचं ठरवलं आहे. यासाठी तिने प्लॅनिंगही केलं आहे, जे तिने सोशल मीडियावर सांगितलं. तिच्या पतीचा वाढदिवस येणार आहे, या दिवशीच तो हा प्लॅन मार्गी लावणार आहे.

संबंधित बातम्या

लव्ह बर्ड्सचा वांदा! किस, रोमान्स सोडा, आता कपलला एकमेकांना चिपकूनही बसता येणार नाही; नवा नियम

गेल्या वर्षी महिलेने तिच्या पतीला एक अप्रतिम भेट दिली होती. पण तिने त्याला दिलेलं हे गिफ्टही ड्रॉवरमध्ये धूळ खात पडलेलं आहे, हे तिला समजलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिने ती भेट तिच्या पतीच्या पसंतीनुसार खरेदी केली होती. तिने त्याला त्याचा आवडता चहा बनवण्याचं किट दिलं होतं.

जाहिरात

तिने त्याला याबाबत विचारलं तेव्हा त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि तो विषय टाळला.  एकतर आपल्याला गिफ्ट देत नाही आणि आपण दिलेल्या गिफ्टचीही कदर नाही. त्यामुळे महिलेने आता तिच्या पतीला धडा शिकवण्याचा विचार केला आहे. आता ती नवऱ्याला दिलेले तेच गिफ्ट पुन्हा त्याच्या वाढदिवसाला देणार आहे.

मृत्यूनंतरही बायकोने नवऱ्याला सोडलं नाही; 7 दिवस त्याच्या मृतदेहासोबतच…; अंगावर काटा आणणारी घटना
जाहिरात

महिलेच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. प्रत्येकाने यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं ते आम्हाला सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या