प्रतिकात्मक फोटो
मुंबई : मित्रांसोबत असोत किंवा मग कुटुंबासोबत असू देत लोकांना फिरायला जायला फारच आवडते. असे फार क्वचितच लोक असतील ज्यांना फारसं फिरायला अवडत नाही. कुठेही बाहेर जायचं म्हणटं की उत्साह अगदी दुप्पट होईल जातो. पण बऱ्याचदा रोड ट्रिप प्लान करत असताना प्रॉबलम तेव्हा येतो, जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये एखादी अशी व्यक्ती असते जिला गाडी लागते किंवा उलट्या होतात. आज आम्ही तुम्हाला असे काही हॅक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्रवासादरम्यान मळमळ होणार नाही, तसेच उलटी ही होणार नाही. खरचं Incognito mode सेफ आहे? ते आपली सर्च हिस्ट्री सिक्रेट ठेवतात? जेव्हा तुम्ही प्रवासासाठी निघण्यापूर्वी मोशन सिकनेसचे औषध खाऊ शकता. हे औषध मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घेतले तर अधिक चांगले होईल. तुम्ही गाडीत पुढच्या सीटवर बसा. सहसा मागे बसणे टाळा कारण मोशन सिकनेस मागच्या बाजूला बसल्यावर जास्त होतो. कारच्या खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून ताजी हवा वाहनाच्या आत येऊ शकेल. प्रवास करताना शांत राहू नका स्वतःला व्यस्त ठेवा. बाहेरच्या गोष्टी पहा आणि बोलत रहा. जास्त वेळ प्रवास करण्याऐवजी मध्येच थांबून थोडा विश्रांती घ्या.
प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान जड किंवा हेवी जेवण खाणे टाळा. यासोबतच जास्त तेलकट पदार्थांऐवजी साधे अन्न खाल्ल्यास चांगले होईल. यासोबतच टॉफी, च्युइंगम किंवा हजमोला सारखे काहीतरी पदार्थ सोबत ठेवा आणि ते खात राहा. (वरील संपूर्ण माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १८ लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)