प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 27 जून : कोणत्याही देशाला इंग्रजीत बोला किंवा मग हिंदीत त्या देशाचं नाव बदलत नाही. पण भारताच्या बाबतील असं होत नाही. आपण हिंदी किंवा मराठीत बोलताना त्याला भारत बोलतो. तर इंग्रजीत बोलताना इंडिया बोलतो, कधी विचार केलाय असं का? एकाद देशाला दोन वेगवेगळे नाव का? चला याबाबत सविस्तर माहिती घेऊ. सुमारे 2 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यघटनेत लिहिल्या प्रमाणे ‘इंडिया दॅट इज भारत’ हे बदलून फक्त भारत करावे, अशी मागणी पुढे आली. म्हणजेच देशाचे नाव फक्त भारत राहिले पाहिजे. खरंतर इंडिया हा ग्रीक शब्द आहे जो इंडिका या शब्दावरून आला आहे, त्यामुळे हे नाव काढून टाकण्यात यावे, अशी याचिकाकर्त्याची इच्छा होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आणि याचिका फेटाळताना स्पष्टपणे सांगितले की, संविधानात भारताचा उल्लेख आधीच आहे. त्यामुळे तो बदलता येणार नाही. Ajab Gajab : असा प्राणी ज्यावर होत नाही किंग कोब्राच्याही विषाचा परिणाम पण तुम्हाला माहितीय का की भारताला हे दोनच नाव नाही आहे. तर भारताचे एकून 9 नावं आहे. हो हे खरं आहे. आता तुम्ही म्हणाल की ती कोणती? मग हा व्हिडीओ पाहा. हा न्यायालयाचा मुद्दा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात किती नावे आहेत? ते आजपर्यंत कोणत्या नावाने ओळखले जाते? या मागची कथा काय आहे? चला सांगू. @omjaiswalvns अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारताचे एकूण 9 नावं सांगण्यात आली आहेत. त्यानुसार भारताला आतापर्यंत 9 नावांनी ओळखले जाते.
उदा., जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्थान आणि इंडिया. प्राचीन काळापासून भारताला या नावांनी ओळखले जाते. तुम्हाला याबद्दल ऐकून नक्कीच धक्का बसला आहे. या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. या नावांमागील कथा काय आहे? तज्ज्ञांच्या मते हिंद, हिंदुस्थान, भारत या नावांचे मूळ सिंधू नदी आहे. पण इथे आपण फक्त सिंधू नदीबद्दल बोलत नाही, तर समुद्राच्या काठावरील त्या भागाबद्दलही बोलत आहोत, जो सर्वात सुपीक मानला जातो. त्याचप्रमाणे भारत हा शब्द कोठून आला, तर भारत हा शब्द भरत या शब्दापासून आला. भरत म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांचा भाऊ. पण त्यात इतर काही भरत यांचाही उल्लेख आहे, जसे की नाट्यशास्त्रातील भरतमुनी, राजर्षी भरत, ज्यांच्या नावावरून मुहावरे देखील आहेत. त्यामुळे भारत यानावाचं मुळ कुठून आलं हे देखील सांगता येत नाही.