JOIN US
मराठी बातम्या / Viral / पाईपमधून येत होता अजब आवाज; डोकावून पाहताच समोर दिसला 'मृत्यू', Video

पाईपमधून येत होता अजब आवाज; डोकावून पाहताच समोर दिसला 'मृत्यू', Video

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाईपमधून काहीतरी आवाज येत आहेत

जाहिरात

पाईपमध्ये बसलेला मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 मे : अनेकवेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून आपण थक्क होतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाईपमधून काहीतरी आवाज येत आहेत. आत काहीतरी बसलं आहे, असं जाणवतं. यानंतर डोकावून पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं, पण कॅमेरा समोर आल्यावर एक अशी गोष्ट दिसली, जी जीवघेणी होती.. रहदारीच्या रस्त्यावरच उतू चाललं प्रेम! स्कूटीवर कपलचा फूल टू रोमान्स, Video Viral @WildLense_India नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आपण पाहू शकता की एका व्यक्तीने पाईपमधून काहीतरी विचित्र आवाज येत असल्याचं ऐकलं. यानंतर त्याने कॅमेरा जवळ नेताच आतून मोठा साप बाहेर आला आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा किंग कोब्रा होता, ज्याच्या चाव्याने क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र हे दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत. अनेकांनी अशावेळी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण किंग कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे. अशा परिस्थितीत जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, या घटनेत सापाला तिथून रेस्क्यू करण्यात आलं की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

संबंधित बातम्या

किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. त्याची लांबी 5.6 मीटरपर्यंत असू शकते. हा साप एकदा चावल्यानंतर तो पीडित व्यक्तीच्या शरीरात सुमारे 2 चमचे इतकं विष सोडतं. त्यामुळे, यानंतर लगेच माणूस बेशुद्ध व्हायला लागतो. दृष्टी धूसर होऊ लागते आणि शरीरावर पक्षाघातासारखा परिणाम होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या