बंगळुरू, 15 मार्च : कोणत्याही गाडीने धडक जरी दिली तरी किती मोठा अपघात होऊ शकतो (Accident video), हे तुम्हाला माहितीच आहे. अशात ती भरधाव गाडी असेल आणि ही गाडी जर भलामोठा ट्रक असेल तर… मृत्यू अटळच. पण अशाच एका भरधाव ट्रकने एका महिलेला उडवलं. पण मृत्यू तिला स्पर्शही करू शकला नाही. एका सुरक्षाकवचामुळे या महिलेचा जीव वाचला आहे. हे सुरक्षाकवच या महिलेकडे होतं ज्याने आपला चमत्कार दाखवला (Woman safe in truck accident video). दररोज किती तरी अपघात होत असतात. अपघाताचे असे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. भरधाव ट्रकच्या धडकेत स्कूटीस्वार महिलेचा भयंकर अपघात झाला. पण तरी ही महिला बचावली (Helmet saved woman life). अपघाताचं हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर काही गाड्या जात आहे. एक महिला स्कूटीवर बसली आहे, ती रस्ता ओलांडण्याच्या तयारीत आहे. एका रोडवरील गाड्या पाहून ती तिथून पुढे जातो. रस्त्याच्या पलिकेड जाण्यासाठी ती रस्त्याच्या मधोमध येतो. तोच दुसऱ्या बाजूने भरधाव ट्रक येतो आणि स्कूटीवर बसलेल्या महिलेला उडवून पुढे निघून जातो. हे वाचा - उडी मारताच …; हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही बंजी जम्पिंगचा विचारही करणार नाही महिला स्कूटीसह उडते आणि जमिनीवर आपटते. स्कूटी एका बाजूला आणि ती दुसऱ्या बाजूला फेकली जाते. जमिनीवर तिचं डोकंही आपटते. अपघात इतका खतरनाक आहे, या महिलेचा जीव गेलाच असंच वाटतं. पण तुम्ही पुढे पाहाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ज्या महिलेचा मृत्यू झाला असावा असं तुम्हाला वाटलं ती महिला जिवंत आहे. इतक्या भयंकर अपघातानंतर ती जमिनीवर स्वतःच उठून बसते आणि आपल्या डोक्यावरील हेल्मेट सरळ करते. त्यानंतर तिला पाहताच काही लोक तिच्या मदतीसाठी धावून येतात. तिला दोन्ही हातांना धरून नेतात आणि एका खुर्चीत बसवतात.
@MangaloreCity ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना कर्नाटकमधील मणिपालच्या पेरामपल्लीत घडल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मंगळवारी या महिलेला दुधाच्या ट्रकने धडक दिली आणि तिला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - 13 वर्षापासून 90 अंशात वळलेली मान;भारतीय डॉक्टरने वाचवले पाकिस्तानी मुलीचे प्राण एकंदर दृश्य पाहता महिलेच्या डोक्यावरील सुरक्षाकवच म्हणजे हेल्मेटनेच तिचा जीव वाचवला आहे, असंच आपण सांगू शकतो. त्यामुळे हेल्मेट न घालता बाईक, स्कूटी चालवणारे किंवा हेल्मेटची गरज नाही, हेल्मेटशिवाय हिरोगिरी करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहायलाच हवा. हेल्मेट काय करू शकतं, तुम्हाला साधा वाटणारा हेल्मेटही कसा तुमचा अनमोल जीव वाचवू शकतो, याचा हा व्हिडीओ पुरावा आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना तुम्हीही हेल्मेट घाला आणि इतरांनाही हेल्मेट घालायला सांगा.