मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

13 वर्षांपासून 90 अंशात वळलेली मान; भारतीय डॉक्टरने शस्त्रक्रिया करून वाचवले पाकिस्तानी मुलीचे प्राण

13 वर्षांपासून 90 अंशात वळलेली मान; भारतीय डॉक्टरने शस्त्रक्रिया करून वाचवले पाकिस्तानी मुलीचे प्राण

अफशीनचा जन्म कुठल्याही सामान्य मुलांसारखाच झाला होता; पण एका अपघातामुळे तिची अशी अवस्था झाली. अफशीन जेव्हा आठ महिन्यांची होती, तेव्हा ती खेळताना पडली होती.

अफशीनचा जन्म कुठल्याही सामान्य मुलांसारखाच झाला होता; पण एका अपघातामुळे तिची अशी अवस्था झाली. अफशीन जेव्हा आठ महिन्यांची होती, तेव्हा ती खेळताना पडली होती.

अफशीनचा जन्म कुठल्याही सामान्य मुलांसारखाच झाला होता; पण एका अपघातामुळे तिची अशी अवस्था झाली. अफशीन जेव्हा आठ महिन्यांची होती, तेव्हा ती खेळताना पडली होती.

नवी दिल्ली 15 मार्च : आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव फार महत्त्वाचा असतो. जोपर्यंत आपल्या एखाद्या अवयवाला ईजा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. बऱ्याचदा असंही होतं, की एखादा दुर्मीळ आजार (Rare Medical Condition) असलेल्या व्यक्तीबद्दल माहिती मिळते आणि मग आपल्याला निरोगी शरीराचं (Healthy body) महत्त्व पटतं. पाकिस्तानमधल्या एका किशोरवयीन मुलीला (Pakistani Girl) आणि तिच्या कुटुंबीयांना असाच अनुभव आला. साधारण 14 वर्षं वय असलेल्या एका पाकिस्तानी मुलीची मान (Neck) गेल्या 13 वर्षांपासून उजवीकडे 90 अंशांत वळालेल्या स्थितीमध्ये होती. नुकतीच एक किचकट शस्त्रक्रिया (Operation) करून या मुलीची मान सरळ करण्यात आली आहे. अफशीन गुल (Afsheen Gul) असं या मुलीचं नाव आहे. प्रसिद्ध भारतीय सर्जन (Indian Surgeon) डॉ. राजगोपालन कृष्णन (Dr. Rajagopalan Krishnan) यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे अफशीनचा जन्म कुठल्याही सामान्य मुलांसारखाच झाला होता; पण एका अपघातामुळे तिची अशी अवस्था झाली. अफशीन जेव्हा आठ महिन्यांची होती, तेव्हा ती खेळताना पडली होती. तेव्हा तिची मान वाकडी झाली होती. परिणामी गेल्या कित्येक वर्षांपासून ती वेदना सहन करत होती. अपघातानंतर आफशीनच्या कुटुंबीयांना वाटलं, की काही काळानंतर तिची मान व्यवस्थित होईल; पण तसं झालं नाही. लहानपणी झालेल्या या अपघाताचं रूपांतर नंतर सेरेब्रल पाल्सीमध्ये (Cerebral Palsy) झालं.

कितीही पाणी प्यायलं तरी तहान काही शमत नाही; लगेच टेस्ट करा असू शकतो गंभीर आजार

सेरेब्रल पाल्सी हा तोच आजार आहे, ज्यामुळे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांचा मुलगा झैन नडेला याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. सेरेब्रल पाल्सी हा स्नायूंचा आजार आहे आणि तो मेंदूतल्या गुंतागुंतीमुळे होतो. मेंदूतल्या बिघाडामुळं मेंदू (Brain) आणि स्नायूंशी (Muscles) संबंधित विकार समोर येऊ लागतात. जन्मापूर्वी, जन्मादरम्यान किंवा जन्मानंतर लगेच सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो. यामुळे मुलांमध्ये समन्वय, कमकुवत स्नायू, शरीर थरथरणं, संवेदना न जाणवणं, दृष्टी व्यवस्थित नसणं, ऐकण्याची समस्या असणं आणि बोलण्यात अडचणी येणं, अशा किती तरी समस्या उद्भवू शकतात. बर्‍याचदा सेरेब्रल पाल्सी असलेली मुलं त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे पटकन बसू, रांगू, फिरू किंवा चालू शकत नाहीत. सेरेब्रल पाल्सी झाल्यामुळे अफशीनचा त्रास वाढला होता. एका वृत्तपत्रानं अफशीनच्या स्थितीची दखल घेऊन तिच्याबाबत सविस्तर लेख छापला होता. त्यानंतर अनेकांचं तिच्याकडे लक्ष गेलं. GoFundMe च्या माध्यमातून तिच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 25 लाख रुपये जमा करण्यात आले. प्रसिद्ध भारतीय ऑर्थोपेडिस्ट, स्पाइन सर्जन (ऑर्थो) आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन असलेल्या डॉ. राजगोपालन कृष्णन यांच्या टीमने अफशीनवर शस्त्रक्रिया केली. डॉ. राजगोपालन कृष्णन यांनी भारतात परतण्याआधी 15 वर्षं राष्ट्रीय आरोग्य सेवेत काम केलं आहे. त्यांची एक डॉक्युमेंटरी (Documentary) अफशीनचा भाऊ, याकूब यानं पाहिली होती.

श्वास थांबलेल्या बाळात डॉक्टरने फुंकले आपले 'प्राण'; काही मिनिटांतच झाला चमत्कार

या डॉक्युमेंटरीमध्ये डॉक्टरांनी अफशीनसारख्या एका मुलाचं ऑपरेशन केल्याचं दाखवण्यात आलं होतं. याकुबनं आपल्या बहिणीसाठी डॉ. राजगोपालन कृष्णन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी तिची शस्त्रक्रिया करण्यासाठी होकार दिला. अफशीनवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी तिला अजूनही सपोर्टवर राहावं लागणार आहे. त्यानंतर ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकते.
First published:

Tags: Rare disease, Viral news

पुढील बातम्या