JOIN US
मराठी बातम्या / Viral / हॉटेलमध्ये सुरक्षितपणे रात्र घालवायची असेल तर दरवाजाला नक्की अडकवा टॉवेल; कर्मचाऱ्याने सांगितलं कारण

हॉटेलमध्ये सुरक्षितपणे रात्र घालवायची असेल तर दरवाजाला नक्की अडकवा टॉवेल; कर्मचाऱ्याने सांगितलं कारण

जे लोक अनेकदा हॉटेल्समध्ये राहतात, त्यांना इथली प्रत्येक गोष्ट माहीत असते. असं असतानाही तुम्ही खोलीत राहता तेव्हा तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था तुम्ही खात्रीपूर्वक करणं आवश्यक आहे

जाहिरात

हॉटेलच्या दरवाजाला अडकवा टॉवेल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 जुलै : आजकाल लोक कधी ऑफिसच्या कामासाठी तर कधी फक्त कुठेतरी फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत त्यांना राहण्यासाठी स्वस्त आणि चांगल्या रूम हव्या असतात. लोक त्यांच्या बजेटनुसार हॉटेल्स आणि रूम्स निवडतात. काही लोकांना लक्झरी प्रॉपर्टीज आवडतात, तर काही लोक Oyo Hotels सारखे स्वस्त पर्याय निवडतात. मात्र, प्रॉपर्टी कोणतीही असली तरी ती सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली असली पाहिजे. जे लोक अनेकदा हॉटेल्समध्ये राहतात, त्यांना इथली प्रत्येक गोष्ट माहीत असते. असं असतानाही तुम्ही खोलीत राहता तेव्हा तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था तुम्ही खात्रीपूर्वक करणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास हॅक्सही सांगत आहोत, जे एका हॉटेलमध्ये क्लिनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने टिकटॉकच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सांगितले. महिला कर्मचारीने सुट्टीसाठी बॉसला पाठवला असा मेसेज, बायकोने वाचताच सुरु झाला वाद टेरेन्स नावाच्या या टिकटॉकरने सांगितलं आहे, की जर तुम्हाला रात्री शांतपणे झोपायचं असेल आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नको असेल तर तुम्हाला एक छोटासा हॅक अवलंबावा लागेल. यासाठी तुम्हाला एक हँड टॉवेल घ्यावा लागेल आणि तो दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या कडीवर अडकवावा लागेल. ते फिरवून दुसऱ्या बाजूने खाली आणावं आणि ते रबर बँडच्या मदतीने चांगले सुरक्षित करावे. यानंतर ते बफर म्हणून काम करेल आणि एखाद्याला बाहेरून दरवाजा उघडायचा असला तरी तो दरवाजा उघडून आत येऊ शकणार नाही. हॉटेलच्या दरवाज्यांच्या सिक्युरिटी क्लीप्स फारशा सुरक्षित नसतात, अशा परिस्थितीत त्याला टॉवेलने बांधल्यानंतर कोणीही ते उघडू शकणार नाही आणि तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकाल. याशिवाय तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाताच तुमचं सामान दरवाज्याजवळ ठेवून आधी कपाट आणि पडद्यामागून बाथरूमपर्यंत आणि पलंगाखाली कोणी आहे की नाही हे तपासा. यावेळी दार उघडेच ठेवा, जेणेकरून काही चुकीचं वाटल्यास तुम्हाला पळून जाण्याचा पर्याय मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या