दोन्ही पाय नसताना चढतोय डोंगर (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 09 जुलै : म्हणतात ना इच्छा तिथं मार्ग… इच्छा असेल तर कोणतीच गोष्ट तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण केल्याशिवाय रोखू शकत नाही. हेच प्रत्यक्षात दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकही पाय नसलेली ही व्यक्ती, जिची जिद्द इतकी की तिच्यासमोर डोंगरही ठेंगणा पडला. पाय नसता या व्यक्तीने डोंगराची उंची गाठली आहे. आपल्या पायाला थोडी जरी दुखापत झाली की आपण पाय धरूनच बसतो. म्हणजे चालताना पाय दुखतो म्हणून चालण्याची हिंमत होत नाही. कामं कशी टाळता येतील हेच आपण बघतो. विचार करा, एखाद्याचे दोन्ही पाय नाहीत… त्याने काय करावं… ज्या व्यक्तीला पाय नसल्याने चालताही येणं शक्य नाही, त्याने डोंगर चढण्याचं स्वप्नं पाहणं, हे शक्यच नाही. पण अशक्यही शक्य करून दाखवलं आहे ते एका व्यक्तीने. जी दोन्ही पाय नसताना डोंगर चढताना दिसली.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती डोंगरावर दिसते आहे. जिचे दोन्ही पाय नाही आहेत. तिने कृत्रिम पाय लावले आहेत. जे फक्त एका काठीसारखे आहेत. याच्याच मदतीने ही व्यक्ती डोंगरावर चढत आहे. तिने गिर्यारोहकांची सुरक्षा उपकरणे परिधान केली आहेत. दोरीच्या सहाय्याने ती डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. बाप रे बाप! हा तर सापांचा बाप; VIRAL VIDEO पाहून उडेल थरकाप पण तुम्ही पाहाल तर डोंगर सरळ उभा आहे. ज्यावर पाय असताना चढणंही मोठं आव्हानच मग पाय नसताना चढणं म्हणजे त्या व्यक्तीसमोर किती मोठं आव्हान आहे, याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. पाय नसल्यामुळे त्याल वर चढण खूप अवगड जात आहे. पण तरीही तो हिंमत न हारता वरती चढताना दिसत आहे. या व्यक्तीची शारीरिक कमजोरी तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्यापासून, भरारी घेण्यापासून रोखू शकली नाही. कृत्रिम पायांच्या मदतीने का होईना आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती धडपडते आहे. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीसाठी काहीही अशक्य नाही. तुमच्या जीवनाबद्दल आणि परिस्थितीबद्दल तुम्ही काय विचार करता आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. साथीदाराला वाचवण्यासाठी सापासोबत भिडला सरडा; VIDEO च्या शेवटी घडलं असं काही, ज्याची कल्पनाही केली नसेल आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केलं आहे. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणतीच गोष्ट रोखू शकत नाही, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या व्यक्तीच्या जिद्दीचं, धाडसाचं, हिंमतीचं सर्वांनी कौतुक केलं आहे. एका युझरने आपण सामान्य परिस्थितीतही असं करण्याचा विचार करू शकत नाही, असं म्हटलं आहे. तर एकाने जिथं मनात भीती नसते, तिथं खूप काही शिकता येतं, असं म्हटलं.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, यावरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.