सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 07 जून : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांची होणारी फसवणूक, जी आपल्या असं काही गोंधळत टाकते की खरं आणि खोटं काय यामध्ये बऱ्याचदा आपल्याला फरकच कळत नाही. सोशल मीडियावर देखील यासंबंधीत अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात. बुद्धीला चालणा देणारे हे फोटो पाहायला नेटकऱ्यांना देखील आवडते. ज्यामुळे ही कोडी सोशल मीडियावर देखील ट्रेंड होऊ लागतात.
साध्या पेंटिंगमध्ये लपलंय केळं, शोधून काढलात तर तुमच्यासमोर बिरबल ही फेल
आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक संख्यांचं कोड आणलं आहे. जे तुम्हाला चक्रावून सोडेल.
सोर्स : सोशल मीडिया
या चित्रात तुम्हाला एकसारखाच नंबर सर्वत्र दिसत आहे. पण असं असलं तरी देखील या संख्यांच्या गर्दीत एक वेगळा नंबर लपलाय, जो तुम्हाला शोधून काढायचा आहे. दररोजच्या वापरातील ‘Password’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला हा नंबर शोधणं सोपं वाटत असलं तरी देखील ते सोपं नाही. त्यासाठी तुम्हा बुद्धीवर आणि नजरेवर जोर द्यावा लागेल तर आणि तरच तुम्हाला त्यातील वेगळा नंबर दिसेल. 58 च्या गर्दीत विषम संख्या कुठे लपली आहे? फ्रेशर्सलाइव्हने तयार केलेल्या या चॅलेंजमध्ये तुम्हाला हिरव्या बॅकग्राउंडमध्ये काळ्या रंगात 58 लिहिलेले दिसत आहे. प्रत्येक ओळीत फक्त आणि फक्त हाच आकडा दिसत असला, पण तरी त्यात अजून एक नंबर आहे, जो वेगळा आहे आणि तो कोणाच्याही लक्षात येत नाही. तुमच्याकडे 8 सेकंदाचा वेळ आहे. या वेळात तो नंबर शोधून काढा.
मिळालं का तुम्हाला उत्तर? जरी उत्तर मिळालं नाही तरी काळजी करण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला ते शोधण्यासाठी मदत करु. जर तुम्ही ती संख्या शोधली तर तुमचं अभिनंदन आणि नाही मिळालं तरी आता तरी ते समजलच असेल. मग तुमच्या मित्रांना हे कोड पाठवा आणि पाहा त्यांना उत्तर शोधता येतंय का?