संपादित छायाचित्र
मुंबई 13 एप्रिल : आजकाल लग्नांमध्ये किरकोळ भांडणं अनेकदा होतात. पण लग्नाच्या मंचावर पाहुण्यांसमोर वराने आपल्या वधूला मारताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी त्याने पुन्हा एकदा नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही क्लिप उझबेकिस्तानमधील आहे आणि ही घटना 2022 मध्ये घडली होती.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये वधू आणि वर स्टेजवर उभा असल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, नवरदेवासोबत नवरीने स्टेजवर एक खेळ खेळला. या खेळात नवरी जिंकली. मात्र यामुळे नवरदेवाला भलताच राग आला. त्याने क्षणभरही विचार न करता तिथेच नवरीला जोरात मारल्याचं पाहायला मिळालं. हे पाहून नवरीच नाही तर तिच्याशेजारी उभा असलेली दुसरी महिलाही शॉक झाली. या घटनेनंतर नवरी रडताना दिसली आणि त्या दोघीही स्टेजवरुन खाली उतरल्या. या घटनेनंतर नवरदेव काहीच न झाल्याचा आव आणत लोकांकडे पाहत राहिला. तो स्टेजवरच उभा राहिला. वराच्या अशा कृत्याबद्दल नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. अनेकांनी म्हटलं, की या घटनेनंतर वधूचं कुटुंब आणि लग्नातील पाहुण्यांनी काहीच का नाही केलं?
एका यूजरने म्हटलं की, “मी हे कृत्य कसे पाहू शकतो. या घटनेविरोधात कोणीतरी आवाज उठवायला हवा होता.” दुसर्याने लिहिलं, “कोणालाही अशी वागणूक देऊ नये. विशेषत: इतरांसमोर, मग तो पुरुष असो किंवा स्त्री.” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रश्न केला की, “वराची एवढी हिंमत का झाली?”