JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवरीने मिठाई खाण्यास नकार देताच नवरदेवाचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून नेटकरीही भडकले

नवरीने मिठाई खाण्यास नकार देताच नवरदेवाचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून नेटकरीही भडकले

नवरदेवाने मिठाई खाऊ घालताना नवरीसोबत असं काही केलं की ते पाहून नेटकरीही भडकले.

जाहिरात

नवरदेवाचं विचित्र कृत्य व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 25 जून : सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओमध्ये नवरी-नवरदेवाचा डान्स, काही व्हिडिओमध्ये मस्ती तर कधीकधी हैराण करणारं काहीतरी पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर असे असतात, जे पाहून सगळेच विचारात पडतात, की असंही होऊ शकतं का? सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे. लग्नातच दाजीची केली ही अवस्था; Video पाहून म्हणाल ‘अशी मेहुणी नको रे बाबा’ आपल्याकडे लग्नसोहळ्यातल्या विधी आणि चालीरीतींमध्ये एक वेगळीच मजा असते. या विधीदरम्यान नवरी आणि नवरदेवाच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ ही समोर येत असतात. आता काहीसा असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. बहुतेक लग्नांमध्ये वरमालेच्या कार्यक्रमाआधी आधी वधू-वर एकमेकांना मिठाई खाऊ घालतात. पण कधीकधी मिठाई खाऊ घालताना अशा काही घटना घडतात, ज्या चांगल्याच व्हायरल होतात.

संबंधित बातम्या

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात नवरदेवाने मिठाई खाऊ घालताना नवरीसोबत असं काही केलं की ते पाहून नेटकरीही भडकले. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. यात आधी नवरी एक रसगुल्ला आपल्या हातात घेते आणि नवरदेवाला खाऊ घालते. यातील अर्धीच मिठाई खाऊन नवरदेव उरलेली मिठाई नवरीला खाऊ घालू लागतो. मात्र, नवरी ती खाण्यास नकार देते. हे पाहून नवरदेवाला राग येतो आणि तो नवरीचं डोकं पकडून तिला जबरदस्ती मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. नवरदेवाच्या या कृत्यामुळे नवरीही नाराज झालेली दिसते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर shravankr7 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ एक लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. तर, करोडो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी .यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या