भाज्या खाताय सावधान!
नवी मुंबई, 30 जून : भाजी विक्रेते किंवा काही ग्राहकही थेट नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येतात. ताजी आणि स्वस्तात भाजी मिळते म्हणून इथं गर्दी असते. पण इथल्या भाज्या खातानाही सावध राहा. कारण या प्रसिद्ध मार्केटमध्ये असा काही धक्कादायक प्रकार दिसून आला आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. हा व्हिडीओ पाहूनच तुम्ही शॉक व्हाल. भाजी घ्यायला गेलं की ती आपण नीट पाहून घेतो. विशेषतः पालेभाजी हिरवीगार, ताजी दिसली की ती आपण पटकन उचलतो. पण ही भाजी चांगली असेलच असं नाही. आता तुम्ही म्हणाल डोळ्यांनी चांगली दिसणारी ही भाजी चांगली का नाही? तर हा व्हिडीओ पाहा. मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला रस्त्याशेजारी बसलेली दिसते आहे. तिच्याजवळ पालेभाज्यांच्या गठ्ठा आहे. तुम्ही पाहाल तर ती पालेभाजी धुते आहे. पण ती रस्त्यावरील घाणेरड्या पाण्यात. पावसाळ्यात रस्त्यात असं पाणी साचतं. रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातच ही महिला पालेभाजी धुताना दिसते आहे. व्हिडीओ पाहूनच उलटी येईल असं हे दृश्य आहे. बाबो! सोन्यापेक्षाही महाग टोमॅटो; 100 रुपये नाही, तर तब्बल 3 कोटी किंमत हे दृश्य नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील आहे. जिथून मुंबई, नवी मुंबईतील इतर मार्केटमध्ये भाजी जाते.
कदाचित तुम्ही खरेदी केलेली, खरेदी करत असलेली किंवा तुमच्या ताटात असलेली पालेभाजीही अशीच धुतलेली असावी. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाजी खाताना सावधान.