टोमॅटोचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटो 100 रुपयांना होताच सर्वांना धक्का बसला आहे. अशाच टोमॅटोची किंमत कोट्यवधींमध्ये आहे, असं सांगितलं तर...
असे टोमॅटो जे सोन्यापेक्षाही महाग आहेत. ज्याच्यासाठी तब्बल 3 कोटी रुपये मोजावे लागतात. म्हणजे या टोमॅटोच्या एक किलोच्या किमतीत तुम्ही 5 किलो सोने खरेदी करू शकता.
हजेरा जेनेटिक्समार्फत विकल्या जाणाऱ्या या टोमॅटोच्या बिया. खास उन्हाळ्यातील टोमॅटोच्या बियांची युरोपच्या बाजारात वेगाने विक्री होत आहे.
या अत्यंत महागड्या टोमॅटोच्या एका किलोच्या बियाणं पॅकेटसाठी तुम्हाला सुमारे तीन कोटी रुपये खर्च करावे लागतील. टोमॅटोच्या एका बियापासून वीस किलो टोमॅटो तयार होऊ शकतात. हे टोमॅटोही खूप महाग आहेत. ते खूप चवदार असतात.
या टोमॅटोची खास गोष्ट म्हणजे यात बिया नसतात. अशा परिस्थितीत टोमॅटो पिकवण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा बियाणं खरेदी करावं लागतं. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)