मुंबई 15 मे : दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. याच्या सेवनामुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे लोकांना दारूपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात येतं. मात्र यानंतरही लोक दारूच्या आहारी जातात. पण आज आम्ही तुम्हाला एका दारूप्रेमी बकरीचा व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बकरीला दारू पिण्यापासून रोखताच तिने भयंकर रूप धारण केल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. यामध्ये दोन मित्र घराबाहेर एकत्र बसून बिअर पार्टी करत होते. या दोघांच्या समोर अनेक बिअरचे कॅन ठेवण्यात आले आहेत. दोघे एन्जॉय करत आहेत. पण त्यांच्या आनंदात एक बकरी आली. दारू मिळत नसल्याचं पाहून तिला भलताच राग आला. यानंतर तिने सर्व शक्तीनिशी त्या व्यक्तीवर हल्ला केला. एवढंच नाही तर ती व्यक्ती बकरीपासून वाचण्यासाठी पळून जात असताना बकरीनेही त्याला आणखी पळवलं. Mango omelette, आता हेच बाकी होतं; Video पाहूनच उलटी येईल, रेसिपी पाहून नेटिझन्स संतप्त व्हिडीओच्या सुरुवातीला या दारूप्रेमी बकऱ्याला आपल्यालाही पेग मिळेल, अशी आशा होती. मात्र त्या व्यक्तीने समोरील बिअरचा कॅन रिकामा करून ग्लासमध्ये भरला. मात्र जेव्हा तो बकरीला देण्याऐवजी स्वतः बिअर पिऊ लागला तेव्हा बकरीला राग आला. तिने काही पावले मागे घेतली. त्यानंतर लगेच पुढे जाऊन शिंगाने त्याला मारू लागली. स्वत:ला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीने तिथून पळ काढला. पण बकरी त्याला सोडायला तयार नव्हती. तिने त्या व्यक्तीचा पाठलाग केला.
हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यावर एका व्यक्तीने स्वत:च्या आवाजाने डबिंगही केलं आहे. यानंतर व्हिडिओची मजा आणखीच वाढली. आतापर्यंत याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. आधीच ही घटना मजेदार होती. त्यात फनी डबिंगची भर पडताच ती आणखीनच मजेदार बनली. तुम्ही देखील या अतिशय मजेदार व्हिडिओचा आनंद घ्या.