जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Mango omelette, आता हेच बाकी होतं; Video पाहूनच उलटी येईल, रेसिपी पाहून नेटिझन्स संतप्त

Mango omelette, आता हेच बाकी होतं; Video पाहूनच उलटी येईल, रेसिपी पाहून नेटिझन्स संतप्त

मँगो ऑम्लेट

मँगो ऑम्लेट

मँगो ऑमलेट विचित्र डिशचा व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 मे : आंब्याशिवाय आंब्याचे तुम्ही बरेच पदार्थ खाल्ले असतील. आमरस, आंब्याची बर्फी, आमपापड, मँगो मिल्कशेक आणि बरंच काही… पण सध्या आंब्यापासून एक असा पदार्थ तयार करण्यात आला आहे, जो पाहूनच उलटी येईल. सोशल मीडियावर आंब्याच्या या विचित्र रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहे. ही डिश आहे मँगो ऑमलेट. मँगो आणि ऑमलेट हे कनेक्शनच मुळात जुळत नाही. अशा एका विक्रेत्याने आंब्याचा रस आणि अंड्याचं ऑमलेट एकत्र करून ही मँगो ऑमलेट ही रेसिपी तयार करण्यात आली आहे. विक्रेत्याने काहीतरी हटके करण्याच्या नादात नको तेच केलं आहे. रेसिपीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. पण कुणाला ही डिश रूचलेली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला विक्रेता तव्यात तेल टाकून त्यात अंडी फोडून टाकतो, त्याचा एक पोळा बनवतो. त्यानंतर अंडी फोडून त्यात काही मसाले टाकतो आणि आंब्याचा रस टाकून मिक्स करतो. ते त्या अंड्याच्या पोळ्यावर काढतो. त्यानंतर उकडलेली अंडी कापून टाकून त्यात मसाले आणि आंब्याचा रस टाकून ते त्या ताटात टाकलं जातं. त्यानंतर वरून चीझ किसून टाकून ही डिश सर्व्ह केली जाते. मे महिनाच कशाला, वर्षभर आंबे खायला मिळतील; एकदा हा VIDEO पाहाच पाहिल्यावर ही डिश आकर्षक वाटते. पण ती बनवताना व्हिडीओ पाहिल्यावर नकोशी वाटते. बहुतेक युझर्सना ही डिश आवडलेली नाही. अनेकांनी तर संताप व्यक्त केला आहे. एका युझरने हा विरुद्ध आहार असून आरोग्यासाठीही हानिकारक असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

दरम्यान आंब्याची व्हायरल होणारी ही पहिली अशी विचित्र डिश नाही आहे. याआधीही मँगो पाणीपुरी, मँगो डोसा, मँगो पिझ्झा अशा बऱ्याच पदार्थांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. Recipe Video : पीठ न मळता, न लाटता बनवा गोलगोल, टम्मं फुगणारी चपाती; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत तुम्हाला ही डिश कशी वाटली. हे मँगो ऑमलेट खाण्याची तुमची तयारी आहे का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात