प्रतीकात्मक फोटो - Canva
रांची, 02 जुलै : लहान मुलं चिप्स आवडीने खातात. तुमचीही मुलं चिप्स खात असतील. असेच चिप्स खाल्ल्यानंतर एका मुलीने आपला जीव गमावला आहे. शाळेत गेलेली ही मुलगी. जिने शाळेच्या लंचमध्ये चिप्स खाल्ले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला. झाडरखंडमधील ही धक्कादायक घटना आहे. जमशेदपूरमधील आदिवासी प्लस 2 हायस्कूल सीतारामडेरामधील नववीच्या वर्गातील ही 14 वर्षांची विद्यार्थिनी, कृतिका कुमारी असं तिचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. ती इयत्ता नववीत शिकत होती.. दुपारच्या जेवणाच्या वेळी अचानक बेशुद्ध पडली. तिच्यासोबत असलेले विद्यार्थी घाबरले. त्यांनी तात्काळ शिक्षकांना कळवलं. शिक्षकही तिथं धावत आले. शिक्षकांनी बेशुद्ध अवस्थेतच तिला तात्काळ रुग्णालयात नेलं.
एमजीएम हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली तिला इंजेक्शनही दिली. पण उपचार सुरू असतानाच तिने जीव सोडला. माहितीनुसार तिने शाळेच्या वर्गात टिफिनमध्ये चिप्स खाल्ले होते. चिप्स खात असतानाच ती बेशुद्ध पडली. प्रवासात नेहमी सोबत ठेवा चिप्सचे रिकामे पॅकेट्स; मोठ्या संकटातून तुम्हाला वाचवेल ‘दैनिक जागरण’च्या वृत्ता नुसार शाळेचे मुख्याध्यापक छोटा लोहरा यांनी सांगितलं की, कृतिकाला आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता. कदाचित अतिउष्णतेमुळे ती बेशुद्ध झाली असावी. बेशुद्ध पडल्यानंतर 10 मिनिटांतच तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.