प्रवास करताना चिप्स खाण्याची सवय अनेकांना असते. चिप्स खाऊन झाल्यावर रिकामं पॅकेट आपण फेकून देतो. पण खरंतर चिप्सचं हे रिकामं पॅकेट चुकूनही फेकू नका. कारण तुम्हाला हा कचरा वाटत असले पण खरं तर ते खूप कामाचं आहे.
किंबहुना रिकामं चिप्सचं पॅकेट तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवेल. एका फ्लाइट अटेंडने चिप्सच्या रिकाम्या पाकिटाचा असा फायदा सांगितला आहे.
माइगुएल मनोज असं या फ्लाइट अटेंडेंटचं नाव आहे. तिने चिप्सच्या रिकाम्या पाकिटांचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल ते सांगितलं आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार माइगुएल म्हणाली, जेव्हा आपण फिरायला जातो आणि एका हॉटेलमध्ये राहतो. तेव्हा सामान्यपणे आपल्याकडील मौल्यवान वस्तू आपण हॉटेल रूममध्येच ठेवतो.
अशा वेळी चिप्सची पाकिटं आणि टिन फॉईलसारख्या वस्तूमध्ये या मौल्यवान वस्तू लपवता येतील. यामध्ये काही असू शकतं, असा कुणी विचारही करणार नाही. त्यामुळे चोरी, लूट अशा संकटापासून तुम्ही वाचाल. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)