पदार्थांनीच काढा शरीरातील पदार्थांचं 'विष'
फूड पॉइझनिंगवर घरगुती उपाय

दूषित अन्न-पाण्यासह आणखी काही कारणांमुळे फूड पॉइझनिंग होतं.

पोटात वेदना, डायरिया, उलटी, थकवा, ताप
ही काही लक्षणं आहेत.

फूड पॉइझनिंगमुळे
इतर गंभीर आजार होऊन 
मृत्यूही होऊ शकतो.

फूड पॉइझनिंग झाल्यास काही पदार्थ खाऊन आराम मिळवता येईल.

दह्यात जिरं-मेथी दाणा पावडर मिसळून खा.

एक वाटीभर दह्यात
एक मोठा चमचा मेथी दाणे मिसळून खा.

ग्लासभर गरम पाण्यात 2 चमचे लिंबू रस, अर्धा चमचा सैंधव मीठ मिसळून प्या.

एक मोठा चमचा लिंबू रसात चिमूटभर साखर मिसळून घ्या.

ग्लासभर पाण्यात अर्धा लिंबू, चमचाभर मध मिसळून प्या.

आल्याचा किस, मध मिसळून
पाणी उकळून प्या.

पुदीन्याची पानं वाटून
ग्लास गरम पाण्यात मिसळून गाळून प्या.

लसणीच्या पाकळ्या तशाच किंवा मधासोबत चावून खा.

गंभीर अवस्थेत मात्र डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्या.