JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News: क्रशला स्लिम मुली आवडतात म्हणून केली डाएटिंग, पण एक चूक अन् मुलीचा धक्कादायक शेवट

Viral News: क्रशला स्लिम मुली आवडतात म्हणून केली डाएटिंग, पण एक चूक अन् मुलीचा धक्कादायक शेवट

मुलीला तिच्यासोबत असलेल्या एका मुलाचं मन जिंकायचं होतं, मात्र त्याचं एका स्लिम मुलीवर प्रेम होतं. अशा स्थितीत मुलगी बारीक होण्याचा प्रयत्न करत होती.

जाहिरात

डाएटिंगमुळे मुलीचा धक्कादायक शेवट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 जून : आपल्या समाजात मुलींच्या सौंदर्याबाबत जे मापदंड ठरवले गेले आहेत, त्यामुळे अनेकवेळा इतकं दडपण येऊ लागतं की मुलांना स्वतःसाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट हेदेखील कळत नाही. हा केवळ भारतीय समाजाचाच विषय आहे असं नाही, चीनची परिस्थिती यापेक्षा वाईट आहे. तिथे एका 15 वर्षाच्या मुलीचा डाएटिंग करताना मृत्यू झाला कारण तिला तिच्या क्रशला इम्प्रेस करायचं होतं. 12 ते 17 वर्षे वय हा माणसाच्या आयुष्यातील असा काळ असतो, जेव्हा त्यांना तेवढी समज नसते. पण ते स्वतःच विचार करून इतर गोष्टी समजू लागतात. या प्रक्रियेत अनेक वेळा असे चुकीचे निर्णय घेतले जातात, ज्याचं नुकसान केवळ मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही भोगावं लागतं. असाच काहीसा प्रकार चीनमधील एका मुलीसोबत घडला, जी प्रेमाच्या नादात जीव गमावून बसली. घरच्यांचा विरोध पत्करुन केलं Love Marriage, पण 5 महिन्यातच घडलं भयानक साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही कहाणी एका 15 वर्षांच्या मुलीची आहे, जी शाळेत शिकत होती. ही मुलगी गुआंगडॉन्ग प्रांतातील डॉन्गगुआन शहरातील आहे. तिची उंची 165 सेमी होती आणि मृत्यूच्या वेळी मुलीचं वजन 25 किलो होतं. मुलगी तिच्या मृत्यूपूर्वी 20 दिवस कोमात होती कारण तिला एनोरेक्सिया नर्वोसा, कुपोषणाचा एक भयानक आजार झाला होता. या मुलीचे फोटो आणि कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे सांगितलं जात आहे की, मुलीला तिच्यासोबत असलेल्या एका मुलाचं मन जिंकायचं होतं, मात्र त्याचं एका स्लिम मुलीवर प्रेम होतं. अशा स्थितीत मुलगी बारीक होण्याचा प्रयत्न करत होती. मुलीचं वजन कमी होत असल्याचं पाहून पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. तीव्र कुपोषणामुळे तिच्या अवयवांनी काम करणं बंद केलं आणि तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की ती कापसासारखी हलकी होती कारण तिचं वजन फक्त 25 किलो होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या